Headlines

दबलेल्या नसा या ५ घरगुती आयुर्वेदिक उपायांनी होतील मोकळ्या, जाणून घ्या !

सध्याच्या धावपळीच्या जगात स्वताच्या सवयींकडे तसेच खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे बरेचदा आरोग्याला नुकसान पोहचते. काहीवेळा शरीराची एखादी नस दबली जाते. त्यामुळे त्या नसांमध्ये खूप दुखते किंवा ती आखडली जाते. काही वेळेस हा त्रास काही दिवसांसाठी असतो. तर काही वेळेला तो काही दिवसांसाठीही होऊ शकतो.

या स्थितीत ती काही काळासाठी नस दबली असेल तर त्याचा काही वाईट परिणाम होत नाही. पण तोच त्रास जर खूप दिवस झाला तर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. त्यावर उपा. करणे गरजेचे असते. आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही घरातल्या घरात नस दबली जाणे यांसारख्या दुखण्यातून त्रास मुक्त होऊ शकतात.

1) मेथीचे दाणे – दबलेली नस खुली करण्यासाठी मेथीच्या दाण्यांचा उपयोग होतो. त्यासाठी मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवत ठेवा. त्यानंतर सकाळी त्यातील पाणी काढून ते ब्लेंड करा. आता ते वाटण दबलेल्या नसेच्या ठिकाणी लेप करुन लावा. वरती सूती पट्टी बांधा. २/३ तासांनी पट्टी खोला. त्यामुळे दबलेल्या नसेच्या दुखण्यातून मुक्ती मिळते.

2) पारिजातकाची पाने – दबलेली नस उघडण्यासाठी पारिजातकाची पाने खूप फायदेशीर ठरतात. त्यासाठी ती पाने पाण्यात उकळवा. पाणी थोडे कोमट झाले की त्या पाण्याने दुखऱ्या नसेवर शेकवा. याव्यतिरिक्त तुम्ही तो काढा पिऊही शकता. त्यामुळे तुमची दबलेली नस खुली होऊ शकते.

3) चूना – बंद झालेली नस उघडण्यासाठी चून्याचा ही वापर करता येतो. यासाठी विड्याची पाने हलकी गरम करा. आता त्यावर चुना लावून दुखऱ्या जागी पट्टी प्रमाणे लावा. काही वेळ ती पट्टी तशीच राहू द्या. काही वेळानंतर ही पट्टी उघडा तुम्हाला खूप आराम पडेल.

4) सैंधव मिठ – दबलेली नस उघडण्यासाठी सैंधव मिठाचा ही वापक करतात. त्यासाठी एका बादलीत गरम पाणी घ्या. त्यानंतर एका सुती कापडात सैंधव मिठाचा बटवा तयार करा. ती पाण्यात टाका. ३० मिनिटे या पाण्यात पाय ठेवून बसा. त्यामुळे होणारे दुखणे कमी होते.

5) बीटाचा रस – शरीरात र’क्त’भिसरण योग्यरित्या न झाल्यास शरीरातील र’क्त’वाहिन्यांवर दाब पडतो. अशा वेळेस बीटाचा रस प्यायल्यास र’क्त पुरवठा योग्य रित्या होतो. व दुखणे कमी होते. तुम्हाला जर नस दबल्यामुळे जास्तच त्रास होत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

अस्वीकरण  दिलेल्या टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. त्यांना कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय शाश्त्राचा सल्ला असा समजू नका. आजारपण किंवा संसर्गाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. वरील माहिती इंटरनेट वरील माहितीचा आधार घेत बनवलेली आहे. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.