Headlines

चहा सोबत चुकूनही खाऊ नका हे ७ पदार्थ, चहा सुद्धा होऊ शकतो कॅन्सरचे कारण जाणून घ्या कसा ते !

चहा म्हणजे चहाप्रेमींसाठी एक व्यसन आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. चहाप्रेमी हे दिवसातून किती ही वेळा चहा पितात. सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री, मध्यरात्री आणि अगदी पहाटेसुद्धा चहा प्याला जातो. मुंबईत तर खास रात्री चहा पिण्याची ठिकाणे आहेत. दक्षिण मुंबई, दादर, परळ, घाटकोपर, बोरीवली, मालाड परिसरात चहाचा स्वाद घ्यायला मिळतो.

अनेक रेल्वे स्थानकाच्या बाहेर हे चहावाले हमखास असतात. टपरीवरचा स्पेशल मसाला चहाला तर तोड नाही. चहाचे अनेक वेगवेगळे प्रकार देखील आहेत. चहा पिल्याने आपण ताजेतवाने होतो किंवा एक प्रकारचा आळस जातो असं म्हटलं जातं कारण चहामधून आपल्या शरीराला कैफीन मिळतं. पण जास्त चहा पिणं हे शरीराला घातक असतं, हे आपण बऱ्याच लोकांकडून ऐकलं असेल. रिकाम्यापोटी चहा पिणं तर शरीरासाठी अधिक धोकादायक असतं. याव्यतिरिक्त बरेच जण चहा पिताना सोबत बिस्कीट किंवा इतर ही काही पदार्थ खाणं पसंद करतात.

पण चहा सोबत आपण जे काही विशिष्ट पदार्थ खातो त्याने देखील आपल्याला त्रास होऊ शकतो. तर आपण चहा पिताना आपण ज्या काही चुका करतो, त्यांचे आपल्या शरीरावर कळत – नकळत काय परिणाम होतात व त्याने कोणते आजार उद्भवू शकतात, आपण पाहूया.

1. गरम गरम चहा पिणे – अगदी गरम चहा पिणाऱ्या लोकांना अन्ननलिकेचा कॅन्सर होण्याची फार शक्यता असते, हे एका संशोधनामार्फत सिद्ध झालं आहे. गरम चहा पियाल्याने गळ्याच्या पेशींना त्रास होतो. त्यामुळे दररोज ७५ डिग्री सेल्सिअस पेक्षाही जास्त गरम चहा पिणाऱ्यांना इसोफेगल नावाचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. गरम चहा प्याल्याने गळ्याच्या कॅन्सर व्यतिरिक्त शरीराला इतर देखील नुकसान होतं जसे की, ऍसिडिटी, अल्सर, पोटाशी संबंधित इतर आजार होऊ शकतात.

2. डिस्पोजल कप मध्ये चहा पिणे – खड्गपूर येथील आयआयटी वैज्ञानिकांनी जो खुलासा केला आहे त्याप्रमाणे, जर एखादी व्यक्ती दिवसभरात ३ ते ४ वेळेस चहा पीत असेल तर ती व्यक्ती ७५,००० अतिसूक्ष्म प्लास्टिकचे कण खातो. संशोधनाच्या माध्यमातून ही गोष्ट सिद्ध झाली आहे कि, या पेपर कपचे वरील आवरण तयार करण्यासाठी सूक्ष्म प्लॅस्टिक आणि इतर अयोग्य घटकांचा वापर करण्यात येतो आणि यामध्ये जर गरम पेय टाकले तर त्या पदार्थात त्याचे दूषित कण समाविष्ट होतात. हे सूक्ष्मकण कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे डिस्पोजल कपमध्ये चहा पिणे टाळावे.

3. चहासोबत हिरव्या भाज्यांचे सेवन – अनेकांना पोळीभाजी खाताना देखील चहा पिण्याची सवय असते. मग भाजी कोणती ही असो. मुळात हिरव्या भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्त्वे असतात, ज्याने शरीराला फार फायदा होतो. परंतु चहा सोबत या भाज्यांचे सेवन केल्याने शरीरात याचे वि*ष निर्माण होते व याचा घातक असा परिणाम आपल्या शरीरावर होतो. कोबी, फ्लॉवर, मुळा, ब्रोकोली, कडधान्य, सोयाबीन या भाज्यांमध्ये गोइट्रोगन्स असतात.

4. चहासोबत बेसनपासून तयार झालेले पदार्थ खाणे – पहिला पाऊस आला की, गरम गरम भजी आणि वाफाळलेला चहा यांचं समीकरणच वेगळं आहे. पण बेसनपासून बनवलेले पदार्थ चहासोबत खाल्ल्याने त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो. शरीरात पोषक तत्त्वांची कमी भासते व सोबतच पोटाचे इतर आजार देखील उद्भवतात.

5. लिंबू – काही जण चहाचा स्वाद वाढवण्यासाठी चहा मध्ये लिंबू पिळून चहा प्यायला जातो. परंतु आरोग्यतज्ञांच्या मते, चहामध्ये लिंबू पिळून तो चहा पिणं स्वास्थ्यासाठी अधिक हानिकारक ठरतं.

6. अंडे – काही लोक अंड्यासोबत सुद्धा चहा पितात. पण चहा आणि अंड खाणं हळू हळू आपल्या शरीराला त्रासदायक ठरु शकतं, याच कारण म्हणजे चहापत्ती मध्ये असलेलं टॅनिक ऍसिड हे अंड्यामधील प्रोटीन सोबत मिसळून टॅनिक ऍसिड प्रोटीनचे कंपाउंड निर्माण करते, जे आतड्याच्या हालचालीमध्ये अडथळे येतात.

7. तृणधान्ये – लोक अनेक विभिन्न प्रकारच्या तृणधान्यांचा वापर करतात. अनरिफाईंड तृणधान्यांमध्ये फायटेटचे प्रमाण जास्त असते, बीज अंकुरताना हे फॉस्फरसच्या रूपात कार्य करते. तृणधान्यांमध्ये आयरन, झिंक, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सुद्धा असते.

संशोधनातून मिळालेल्या माहितीनुसार फायटेटचे प्रमाण वाढल्याने ॲनिमिया होऊ शकतो. सोबतच झिंकचे प्रमाण कमी होते. नाश्त्यामध्ये तृणधान्यांचा समावेश केला जातो आणि नाश्ता करताना आपण चहा पिणं स्वाभाविक असतं. त्यामुळे यासोबत चहा पियाल्याने शरीरावर विपरीत परिणाम होतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

अस्वीकरण  दिलेल्या टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. त्यांना कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय शाश्त्राचा सल्ला असा समजू नका. आजारपण किंवा संसर्गाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.