हिवाळ्याच्या ऋतूला हळुहळु सुरुवात होऊ लागली आहे. गुलाबी थंडी जाणवायला लागल्यामुळे लोक थंडीचे कपडे, खाण्याचे पदार्थ यांसारख्या गोष्टींची जमवाजमव करु लागले आहेत. मात्र यासोबतच थंडीत होणाऱ्या त्रासाची चिंता देखील लोकांना सतावू लागली आहे.
या ऋतूत सर्दी, पडसे यांसारख्या आजारांसोबतच काही त्वचेच्या समस्या देखील उद्भवतात. या दिवसांत अनेकांना त्वचेला खाज येण्याची चिंता भेडसावत असते. यामागील मुख्य कारण म्हणजे या दिवसात आपली त्वचा खुप ड्राय पडते. तर काहींना लोकरीच्या कपड्यांची एलर्जी होते, त्यामुळे असा त्रास होतो. काही वेळेस अंघोळ नीट केली नसेल तर काही वेळेस तापमानात घट झाल्याने ही समस्या उद्भवते.
त्वचा ड्राय होऊ नये, ती मॉइश्चराइझ रहावी यासाठी लोक विविध उपाय करतात. यासाठी बाजारात उपलब्ध असेलेली महागडी क्रिम्स, पावडर यांचा वापर केला जातो. पण त्वचा चांगली ठेवण्यासाठी केवळ एवढेच करुम चालणार नाही. याव्यतिरिक्त तुम्हाला योग्य आहाराचे सेवन करणे देखील महत्वाचे आहे.
सोबतच भरपूर पाणी प्यावे. आज आम्ही तुम्हाला या लेखा द्वारे हिवाळ्यात सेवन करायच्या काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत. त्यामुळे तुम्हाला उर्जा तर मिळेलच शिवाय तुमच्या त्वचेची काळजी देखील घेतली जाईल.
1. ऊस – हिवाळ्याच्या ऋतूत ऊसाच्या रसाचे सेवन करणे तुमच्यासाठी शरीरासाठी भरपूर फायदेशीर ठरु शकते. ऊसामुळे आपल्या त्वचेसंबधी आजारामुळे आपले रक्षण होते. यामुळे आठवड्यातुन 3/4 वेळा तरी ऊसाचा रस प्यावा. ऊसाच्या रसामुळे आपल्या शरीरीतील साखरेचे नैसर्गिकरित्या संतुलन होते. तसेच पाण्याच्या पातळीत सुद्धा वाढ होते.
2. मुळा – हिवाळ्याच्या ऋतूत मुळ्याचे सेवन करणे फायदेशीर ठरते. यामुळे शरीरास आवश्यक असणारी उर्जा मिळते. तसेच शरीरातील रोगप्रतिकराक शक्ती वाढते. सकाळी लवकर उठल्यावर उपाशी पोटी मुळ्याचे सेवन केल्यास ते जास्त फायदेशीर ठरते.
3. सफरचंद – एका सफरचंदाचे सेवन केल्यास आजार आपल्या आसपास फिरकत नाहीत त्यामुळे जितके जमेल तितके सफरचंदाचे सेवन करावे असा सल्ला डॉक्टरांमार्फत दिला जातो. याशिवाय थंडीच्या दिवसात सफरचंद खाल्यास या दिवसात उद्भवणाऱ्या त्वचेसंबधी आजारांपासुन दूर राहता येते.
4. गव्हाच्या गवताचा रस – गव्हाच्या गवताचा रस आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. या रसाच्या सेवनामुळे मोठमोठ्या आजारांपासुन सुटका होते. हिवाळ्याच्या ऋतूत सतत खाज येते या त्रासा सोबतच त्वचेसंबधीत इतर आजार देखील कमी होतात.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !
अस्वीकरण – दिलेल्या टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. त्यांना कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय शाश्त्राचा सल्ला असा समजू नका. आजारपण किंवा संसर्गाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.