Headlines

अखेर ठरले मानसी नाईक घेणार घ’ट’स्फो’ट, स्वतः खुलासा करत दिली हि धक्कादायक माहिती !

मानसी नाईक मराठी इंडस्ट्रीमधील एक नावाजलेले नाव आहे. मानसीने प्रोफेशनल बॉक्सर प्रदिप खरेरा सोबत लग्न केले. जानेवारी २०२१ मध्ये हे दोघे लग्नाच्या बंधनात अडकले. मानसी आणि प्रदिपने अत्यंत वाजत गाजत लग्न केले. प्रदिप पंजाबी आहे आणि मानसी मराठी तरीही हे दोघे एकमेकांना खूप चांगल्या पद्धतीने समजून घेत होते.

काही दिवसांपूर्वीच मानसीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून लग्नाचे सगळे फोटो आणि व्हिडीओ डिलिट केले आहेत. यासोबतच तिच्या ज्या ज्या व्हडीओमध्ये प्रदिप दिसत होता ते व्हिडीओ देखील मानसीने डिलीट केले आहेत. मानसी आणि प्रदीपने एकत्र अनेक व्हिडीओ शूट केले होते.

मानसीने सांगितले,’ हो हे खरे आहे. मी आणि प्रदिप वेगळे होणार आहोत. आम्ही आता एकत्र राहात नाही. मला माझ्यासाठी योग्य निवड नाही करता आली. वेगळं होण्यामागच कारण मी नाही सांगू शकत. मी एवढंच सांगेन मी या सगळ्यातून आणखी स्ट्रॉंग बनून बाहेर येईन.

अशी एक वेळ येईल जेव्हा मी मानसिक रित्या पूर्ण बरी असेन, तोपर्यंत हे सगळं झेलण्यासाठी मी तितकी स्ट्रॉंग आहे. ही आता माझ्यासाठी परीकथा राहिलेली नाही. हा विषय इथेच बंद होत आहे. मी त्याला आणि त्याच्या फॅमिलीला शुभेच्छा देते. पण सध्या माझ्यासाठी माझं मानसिक रित्या चांगलं राहणं गरजेचं आहे.’

सध्या मानसीच्या सोशल मीडियावरील पोस्ट बाबत देखील सगळीकडे चर्चा सुरु आहे. मानसीने तिच्या सोशल मीडियावर देखील याबाबत पोस्ट केली होती. तर प्रदिपच्या टाईमलाइनवर रोजच्या त्याच्या दिवसभरातील घडामोडी दिसत आहेत. तो बाहेर गेलेला तेव्हाचे त्याचे फोटो तर पार्टी मधले काही फोटो बीच वरचे अशा पद्धतीचे नॉर्मल फोटो दिसत आहेत.

प्रदिपने त्याच्या स्टोरीवर देखील फक्त क्लोज फ्रेंड्ससाठी स्टोरी शेअर केली होती. प्रदिपला जेव्हा या स्टोरी बद्दल विचारले गेले तेव्हा तो म्हणाला मला या विषयावर काही बोलायचे नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manasi Naik (@manasinaik0302)


मानसी नाईक आणि प्रदीप खरेराच लग्न १९ जानेवारी २०२१ ला झाल होतं. २०२० च्या फेब्रुवारीमध्ये मानसीने तिच्या आणि प्रदिपच्या नात्याबद्दल सांगितले. नोव्हेंबर २०२० ला त्यांचा साखरपुडा झाला आणि अवघ्या दोन महिन्यातच त्यांनी लग्न केले. दोघेही एकमेकांसोबत खूप खुश होते. ते दोघे नेहमी एकमेकांसोबतचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करायचे. त्या दोघांनी एकत्र अनेक रिल्स केल्या होत्या. प्रदिपच्या अनेक फॅमिली फंक्शनमध्ये देखील मानसी सातत्याने जायची.

मानसी नाईक तिच्या डान्ससाठी आणि अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. बघतोय रिक्षावाला ग वाट माझी बघतोय रिक्षावाला हे मानसीचं गाणं खूप जास्त गाजलं होतं. मानसी नाईक मराठी इंडस्ट्रीमधली बोल्ड अभिनेत्री आहे. बाई वाड्यावर या या गाण्यावर देखील मानसीने डान्स केला आहे. मानसीने अनेक आयटम सॉंग शूट केले आहेत. यासोबतच तिने अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. चार दिवस सासूचे या अत्यंत गजलेल्या मालिकेत देखील मानसीने काम केले होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !