अभिनेत्री विशाखा सुभेदारने ‘हास्य जत्रा’ सोडण्याचा निर्णय, म्हणाली असले घाण आरोप लावू नका !

bollyreport
4 Min Read

विरंगुळा म्हणुन टीव्ही पाहिली जाते. पण टीव्हीवरसुद्धा सतत एकच रटाळ गोष्टी पाहुन लोकांना कंटाळा येतो. त्यामुळे त्यातही विरंगुळा म्हणुन चला हवा येऊ द्या , कॉमेडी एक्सप्रेस , महाराष्ट्राची हास्य जत्रा यांसारख्या विनोदी मालिका पाहण्याकडे लोकांचा कल आहे. अशा मालिकांमध्ये रोजच्या दैनंदिन आयुष्यातील विषयांवर विनोदी ढंगात सादरीकरण केले जाते. या मालिकेतील कलाकारसुद्धा तितकेच प्रसिद्ध झाले आहेत. सध्या महाराष्ट्राची हास्य जत्रा या मालिकेचे वेड अख्या महाराष्ट्राला लागलेले दिसते. या मालिकेने नुकताच ५०० भागांचा टप्पा पार केला. मालिकेतील प्रत्येक कलाकाराचा वेगळा असा चाहता वर्ग आहे. या मालिकेतील सर्वात प्रसिद्ध आणि प्रेक्षकांची लाडकी जोडी म्हणजे विशाखा सुभेदार आणि समीर चौघुले. पण आता ही जोडी या मालिकेत दिसणार नाही. कारण अभिनेत्री विशाखा सुभेदारनेही मालिका सोडली आहे. याबाबतची फेसबुक पोस्ट नुकतीच तिने शेअर केली.

तिने पोस्टमध्ये लिहीले की “नमस्कार मंडळी..अनेक वर्ष.. स्किट फॉरमॅटमध्ये काम करतेय. कॉमेडी एक्सप्रेस, फु बाई फु, बुलेट ट्रेन, आणि हास्यजत्रा..! २०११ मध्ये पहिलं पर्व विजेता जोडी,मांगले आणि मी.. ते आज २०२२ समीर विशाखा..असा मोठा प्रवास आहे. हा प्रवास खरंच सोपा नाहीय. मी काही फार मोठी विनोदी अभिनेत्री नव्हतेच कधी, पण दिलेली भूमिका तडीस नेणे, त्यात काय करता येईल ह्याचा शोध घेणे किंवा जे लेखकाने लिहिले आहे ते उत्तमरित्या बाइंडिंग करून सादर करणे हे मात्र प्रामाणिकपणे केलं.

माझ्या सहकलाकारांच्या साथीने, आम्हा दोघांचीही काम कशी फुलतील ह्याचा विचार करतं, त्यांच्याबरोबर परफॉर्मन्ससाठी लागणारे ट्युनिंग, बॉण्डिंग, केमेस्ट्री सगळं क्रिएट केलं. प्रत्येक स्किट मी जगले. माझ्या अभिनय क्षेत्रातील प्रवासात सचिन मोटे, सचिन गोस्वामींचा प्रचंड मोठा वाटा आहे. त्यांच्यामुळेच मी विनोदी अभिनेत्री म्हणून ओळखली गेले. ‘Wet-cloud productions’च्या पहिल्या पहिल्या थेंबापासून ते आत्ता ह्याक्षणी डोळ्यात साठणाऱ्या थेंबपर्यंत मी जोडले गेले.”

पुढे विशाखा म्हणाली, “सातत्याने त्यांच्या सोबत काम करतेय..! आणि ह्या फॉरमॅटमध्ये ही एक फेरी हिंदी कॉमेडीमध्ये ही मारून आले..! दरवेळेस स्किट झाल्यावर किंवा होण्याआधीच टेन्शन भयानक असत. कालच्यापेक्षा चांगल करायचं, त्या टेन्शन मधून काहीकाळ बाहेर पडतेय..! (अजून दोन तीन एपिसोड दिसेन shoot झाले आहेत ते.) एक छान, उत्तम रंगवता येईल अशी भूमिका, मग ती फिल्म मधली २०/२५ दिवसांच्या प्रवासाची किंवा नाटक ५०० ते १ हजार प्रयोगाची, किंवा मग सीरियल मधली असो, मला ह्या वाटेवरचा प्रवास सुरु करायचा आहे..! इथलाही प्रवास खडतरच असतो, सोपा नाहीच तो. पण ना, इथे एकाच भूमिकेत राहून काही काळ प्रवास करता येतो, त्या भूमिकेबरोबर तिला न्याहाळात, तिला जपत, तिला अंजारातगोंजारात, तिला वेळ देऊन, तिच्यासोबत खेळता येत, शांत चित्ताने दिग्दर्शकाचा “ओके” हा शब्द कानाशी साठवून सुखाने घास घेऊन निजता येत.”

“आत्ता हे “असं” काम शांत चित्ताने करण्याची इच्छा झाली आहे..! रसिकहो आजवर तुम्ही माझ्या प्रत्येक भूमिकेवर प्रेम केलेत. त्याबद्दल खरच मनापासून आभार. हास्य जत्रेने मला खुप काही दिलंय आणि तुम्ही जत्रेवर नितांत प्रेम केलेत.. जत्रेतल्या माझ्यावर भरभरून पत्र/ लेख लिहिलीत, कविता केल्यात..माझ्यावर कौतुकाचा वर्षाव केलात,त्याबद्दल मी स्वतःला फार भाग्यवंत समजते. तुम्ही जसं हास्यजत्रे वर प्रेम केलंत तसच मी ही खुप प्रेम केल, करतेय आणि करेन.

जीव ओतून काम केल..! प्रत्येक स्किट नंतर गोस्वामी काय म्हणतील ह्यासाठी कानाचे द्रोण ही केले..! त्यात कधी यश आल आणि कधी नाही..! प्रयत्न करत राहिले पण आत्ता थोडी धावपळ होतेय. मला खरंच अभिमान आहे कीं मी ह्या जत्रेचा भाग झाले.. आणि हा भाव मनात आयुष्यभर राहील”, असे विशाखा म्हणाली.

मालिकेतुन विशाखाने घेतलेल्या अशा अचानक एक्झिटमुळे समीर-विशाखा यांच्या धमाल कॉमेडी स्किटला प्रेक्षक मुकणार हे नक्की.

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.