Headlines

अरुंधती सर्वोत्कृष्ट आई, संजनाने पटकावला सर्वोत्कृष्ट खलनायिकेचा पुरस्कार, जाणून घ्या कोणाला कोणता पुरस्कार मिळाला !

रविवार ३ एप्रिलला स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा २०२२ पार पडला. गेले काही दिवस या सोहळ्याचे प्रमोशन चॅनलकडुन जोरदार चालु होत. सोशल मीडियावर , वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे, मालिकांमधुन या सोहळ्या बाबत प्रमोशन केले जात होते. त्यामुळे सोहळ्या विषयीची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात अगदीच शिगेला पोहचली होती. शिवाय चॅनल्स टीआरपी, स्लॉट लिड़रच्या बाबतीत पण स्टार प्रवाह पुढे आहेच.

या वर्षी या कार्यक्रमांचे सुत्रसंलाचन सुख म्हणजे काय असतं फेम गौरी -जयदिप आणि रंग माझा वेगळा मधील कार्तिक आणि ठिपक्यांची रांगोळी मधील अपुर्वाने करत सोहळ्याला चार चांद लावले. या स्टार प्रवाहवर प्रसारित होणाऱ्या मालिकांमध्ये काम करणारे सर्वच बालकलाकार हे खुपच सरस आहेत त्यामुळे सर्व बालकलाकारांना विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यानंतर नवे लक्ष्य ही पोलिसांच्या शौर्यावर आधारित असलेल्या मालिकेतील कलाकारांनावर विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यानंतर सुरुवात झाली ती इतर पुरस्कारांना.

या वर्षी सर्वोत्कृष्ट आईचा पुरस्कार अरंधतीला मिळाला, तर सर्वोत्कृष्ट बाबा हा पुरस्कार पिंकीचा विजय असो मालिकेतील म्हादू यांनी पटकावला. त्यानंतर सर्वोत्कृष्ट सून आणि नवरा हे पुरस्कार फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील कीर्ती जामखेडकरने आणि तिचा नवरा शुभम यांनी पटकावला. या वर्षीची सर्वोत्कृष्ठ खलनायिका ठरली ती म्हणजे आई कुठे काय करते मधली संजना. सर्वोत्कृष्ट जोडी हा पुरस्कार सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील जयदीप आणि गौरीला मिळाला. तर स्वाभिमान मालिकेतील शंतनू-पल्लवीला सर्वोत्कृष्ट स्टायलिश जोडीचा पुरस्कार मिळाला.

या वर्षीची सर्वोत्कृष्ट मुलगी ठरली लग्नाची बेडी मालिकेतील सिंधू. सर्वोत्कृष्ट सासु आणि सासरे हे पुरस्कार रंग माझा वेगळा मधील सौंदर्या म्हणजेच अभिनेत्री हर्षदा खानविलकरने व आई कुठे काय करते मालिकेतील आप्पा यांना देण्यात आले. या वेळी ग्लॅमरस चेहरा स्त्री आणि पुरुष असे विशेष पुरस्कार देखील ठेवण्यात आलेले. या पुरस्काराचे मानकरी ठरले ते म्हणजे ठिपक्यांची रांगोळी मधील अपुर्वा व अबोली मालिकेतील अंकुश या दोघांना वामन हरी पेठे ज्वेलर्सकडुन विशेष पारितोषिक ही देण्यात आले. या वर्षीची सर्वोत्कृष्ट भावंड या पुरस्काराचे मानकरी सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील सूर्या, पश्या, वैभव आणि ओंकार ठरले. तर मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद या मालिकेच्या सुत्रसंचानासाठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकरला सर्वोत्कृष्ट सुत्रधाराचा पुरस्कार मिळाला.

सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य म्हणून मुरांबा मालिकेतील अक्षय आणि पिंकीचा विजय असो मालिकेतील पिंकीला सन्मानित करण्यात आले. या वर्षीचा सर्वोत्कृष्ट परिवार या पुरस्कारासाठी स्टार प्रवाह वरील बऱ्याच मालिकांना नोमिनेशन होते मात्र त्या सर्वांना मागे टाकत ठिपक्यांच्या रांगोळीतील कानिटकर परिवाराने पुरस्कारासाठी बाजी मारली. आणि मग सर्वात महत्वाचा पुरस्कार तो म्हणजे सर्वोत्कृष्ट मालिका… रंजक वळणे, सुरेख कथानक, आणि योग्य कलाकारांची भट्टी यामुळे रंग माझा वेगळा ही मालिका सर्वोत्कृष्ट मालिका ठरली.

या वर्षी मराठी हिंदु पद्धतीचे सण सोहळे अशी या कार्यक्रमाची थीम होती. आणि या थीमला थोडासा ट्विस्ट म्हणुन मालिकांच्या कलाकारांमध्ये त्याच्या पोशाखावरुन स्पर्धा ठेवली होती. या स्पर्धेत सहकुटुंब सहपरिवाराने बाजी मारली.
श्रीरंग गोडबोले, मंगल केंकरे, भरत जाधव, वैजयंती आपटे,मिलिंद इंगळे या दिग्गजांनी या पुरस्कारांसाठी परीक्षण केलेले.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !