मोठं होऊन आयुष्यात अमुख एखादी गोष्ट करावी असं मनाशी तटस्थपणे ठरवलं तर कोणत्याही परिस्थितीत आपण ती गोष्ट करतोच. नुकताच दहावीचा निकाल जाहिर झाला. यावेळी सगळ्या विद्यार्थ्यांना खूप चांगले गुण मिळाले आहेत. त्यामुळे त्याच सगळीकडून कौतुक होताना दिसते.
हल्ली विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सर्वकाही सुविधा उपलब्ध आहेत. शिवाय काही अडल्यास त्यांचे पालक काही ना काही करुन ती समस्या सोडवतात त्यामुळे अभ्यास करताना विद्यार्थ्यांना फारशा अडचणी येत नाही. पण काही विद्यार्थी असे असतात ज्यांना अभ्यासासाठी फारशा सोयीसुविधा मिळत नाही. पण त्यांना अभ्यास करण्याची जिद्द असते. आणि ते विद्यार्थी त्या परिस्थितीवर मात करतात.
अशाच नांदेड मधल्या शुभम कोडगिरवारचे सर्वत्र कौतुक होत आहे. शुभमचे वडील तो लहान असतानाच गेले. त्याच्या घरची परिस्थिती खूप बिकट असल्यामुळे तो लहानपणापासूनच काम करत होता. त्याची आई ग्रंथालयात काम करते. त्याचा मोठा भाऊ पेपर टाकायचा. शुभम यावर्षी दहावीला होता. त्याला ८२ टक्के मिळाले. आई आणि भावाला मदत करण्यासाठी तो देखील पेपर टाकण्याचे काम करायचा.
घरातली काम सांभाळून तो अभ्यास करायचा. पण त्याच्या कष्टाचे चीज झाले आहे. परीक्षेत चांगले गुण मिळाल्यामुळे त्याचे कौतुक होत आहे. पण आता शुभमच्या नव्या आयुष्याची सुरुवात होत आहे. या आयुष्यात त्याला मदतीची गरज आहे. शुभमच्या शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग आणि वृतपत्र विक्रेत्यांमधुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !