Headlines

आजपर्यंतच्या मराठीच्या इतिहासातली सर्वात बोल्ड वेबसिरीज ‘रानबाजार’, प्राजक्ता माळीला पाहून तुम्हालाही धक्का बसेल !

.हिंदी इंग्लिश इंडस्ट्रीत बोल्ड सिन्स सर्रास दाखवले जात असले तरी मराठी इंडस्ट्रीत मात्र ते अजुनही फारसे आरुढ झालेले नाहीत. पण कदाचित या प्रथेला कुठेतरी पुर्णविराम लागु शकतो ते प्लॅनेट मराठीच्या नव्या वेबसिरीज द्वारे. रेगे, ठाकरे फेम दिग्दर्शक अभिजीत पानसे पुन्हा एकदा नवी रानबाजार ही नवी वेबसिरीज घेऊन येत आहे. नुकताच या वेबसिरीजचा टीझर सोशल मीडीयावर लॉन्च करण्यात आला.

या वेबसिरीजमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडीत प्रमुख भुमिकेत दिसणार आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा टीझर शेअर केला. या टीझरमध्ये ती हातात सिग्रेट ओढत, स्वताचे कपडे काढताना अशा खुपच बोल्ड लुक मध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे या टीझरला तिचा महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहे असा आवाज येत आहे. सीनच्या विरुद्ध बॅकग्राउंड व्ह़ॉइस असल्याने नक्की हे प्रकरण आहे तरी काय हे पाहणे खुपच रंजक ठरेल. तेजस्विनीने या टिझरला “एकदा लोकांची सेवा करून पाहिली…, एकदा प्रेमात त्याग करूनही पाहिला…, एकदा बदलाही घेतला..! आता मात्र फसत चाललीय…, सत्तेच्या जाळ्यात अडकलेल्या एका फुलपाखरासारखी…, वेबविश्वाला हादरवून टाकणारा ‘रानबाजार’ट्रेलर येतोय १८ मे ला!” असे कॅप्शन दिले आहे.

या नव्या कोऱ्या वेबसिरीजबद्दल दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी देखील त्यांचे मत व्यक्त केले. ते म्हणाले, “आज सर्वांच्या हातात बघायला ग्लोबल कॅान्टेन्ट आहे तसं पाहिलं तर भाषेचा अडथळा कधीच पार झालाय. त्यामुळे एका सशक्त विषयाची मांडणी उत्तमरीत्या केली तर ती निश्चितच लोकांना आवडेल, सर्वदूर पोचेल असा विश्वास मला आणि अक्षयला वाटला.

आणि मग मराठीतल्या सर्वात सर्वार्थाने मोठ्या अशा ‘रानबाजार’ची निर्मिती झाली. यात राजकारण आहे, गुन्हेगारी आहे, याशिवाय थरारही आहे. अशा काही गोष्टींवर भाष्य करण्यात आले आहे, ज्या कदाचित आधी घडून गेल्या आहेत. हा एक वादग्रस्त आणि बोल्ड विषय आहे. अनेक गोष्टी ‘रानबाजार’ पाहिल्यावरच उलगडतील. जाणकारांच्या मते विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवरील आतापर्यंतच्या कॅान्टेन्टमध्ये हा सर्वोत्कृष्ट कन्टेंन्ट असणार आहे.”

प्लॅनेट मराठी ओटीटीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, “यापूर्वी मी अभिजित पानसेंचे काम पाहिले आहे. आतापर्यंत त्यांनी जे विषय हाताळले आहेत; त्याला तोड नाही. ज्यावेळी त्यांनी मला ‘रानबाजार’विषयी सांगितले, त्याचवेळी मी या प्रोजेक्टचा भाग होण्याचा निर्णय घेतला. अतिशय थरारक कथानक असलेल्या या वेबसीरिजमध्ये कलाकारही तितक्याच ताकदीचे आहेत. आजपर्यंत ओटीटीवर अशी वेबसीरिज कधीच प्रदर्शित झाली नसेल. इतका दमदार आशय यात पाहायला मिळणार आहे. दहा भागांची ही वेबसिरीज प्रत्येक वेळी एका अशा वळणावर येऊन थांबणार आहे, जिथे प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचेल.

राजकिय, गुन्हेगार व थरार असा या वेबसिरीजचा विषय आहे. यामध्ये तेजस्विनी पंडीत सोबतच अभिनेत्री प्राजक्ता माळी देखील प्रमुख भुमिकेत दिसेल. प्लॅनेट मराठी, अक्षय बर्दापूरकर प्रस्तुत रावण फ्युचर प्रॉडक्शन्स, अभिजित पानसे आणि अनिता पालांडे निर्मित ‘रानबाजार’ ही वेबसिरीज २० मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !