स्टार प्रवाह वाहिनीवरील एकंदरीत सर्वच मालिका सध्या खुप हिट आहेत. त्यातीलच एक फुलाला सुगंध मातीचा या मालिनेकेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला हे आपण जाणतोच. या मालिकेतील मुख्य पात्र म्हणजे शुभम आणि किर्ती हे लोकांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत.
सध्या त्यांच्यातील प्रेमकहाणी हळूहळू फुलत असल्यामुळे प्रेक्षकांनादेखील मालिका पाहण्यास मजा येत आहे. या मालिकेत शुभमचा मिठाईचा व्यवसाय असतो तर किर्तीचे आयपीएस होण्याचे स्वप्न असते. शुभमच्या साथीने ती ते स्वप्न पुर्ण करण्याचा अतोनात प्रयत्न करत असते पण शुभमची आई याला विरोध करते. तरी जिद्दीने किर्ती त्यांचे मन वळवतेच व ट्रेनिंगसाठी जाते.
सध्याच्या ट्रॅकनुसार किर्ती तिचे ट्रेनिंग घेऊन घरी परतली आहे आणि मुख्य म्हणजे तिची पोस्टींगसुद्धा किर्ती जिथे राहते तिथेच शिर्डीला होते.नुकत्याच झालेल्या काही भागात किर्तीची जबरदस्त एन्ट्री तिच्या घरात होताना दाखवली. घरी येऊन ती संगळ्यांशी मायेने संवाद साधते आणि घरातल्या मोठयांच्या पाया पडते. ज्यावेळी ती जिजी अक्काच्या पाया पडते त्यावेळी त्या किर्तीला थांबवतात व माझ्या पाया पडु नकोस. आणि जर पडायच्या असतील तर आधी साडी नेस आणि मगच माझ्या पाया पड. त्यानंतर किर्ती ती साडी घेऊन जाते.
किर्तीने जरी जीजी अक्कांचे म्हणने निमुटपणे ऐकले असले तरी प्रेक्षकांना मात्र तो सीन आवडलेला नाही. प्रेक्षक त्या सीनमुळे मालिकेवर प्रचंड नाराज आहेत. तसेच युजर्सनी मालिकेच्या लेखकावर पण ताशेरे ओढले आहे.
काहींनी कमेंटमध्ये मला असे मनापासून वाटते की सर्व वाहिन्यांवरील मालिकांचे कथा-पटकथा-संवाद लेखक आहेत हे सर्वजण कदाचित मनोरुग्ण असावेत म्हणूनच की काय त्यांनी त्यांच्या डेली-सोपचा मार्ग एक सारखाच ठेवलेला आहे…..कोणतीही मालिका पहावी म्हटलं तर सगळीकडे स्त्री पात्रांचे हेवेदावे-मान/अपमान-कट/कारस्थानं-आणि पुरुष पात्रांची झालेली मेशपात्रं हेच भागायला लागते…..कोणत्याही मालिकेमुळे प्रेक्षकांची घटकाभर का होईना करमणूक वा मनोरंजन होताना दिसत नाही…..ऐतिहासिक आणि धार्मिक मालिकांना सुद्धा ह्या अति शाहण्या मंडळींनी सोडलेले नाही…..आधीच जनता त्यांच्या वास्तविक आयुष्यात ताण तणावाने वैतागलेली असतांना त्यात अजून ह्या महाभागांची भर…..त्यापेक्षा ह्या फडतूस मालिका न बघितलेल्याच बऱ्या…..!!
तर काही म्हणाले जो कोणी लेखक असेल त्याला आधी शिकवावे, असे अनेकांनी म्हटले आहे. तर एकाने अडाणी जीजी आक्का.. एवढा कसला माज.. वर्दीत आशीर्वाद द्यायला लाज वाटते का? तेव्हा साडी नेसायला लावली.. मूर्ख बाई.. बकवास मालिका.. कधीतरी चांगले दाखवा असे म्हणत संताप व्यक्त केला आहे. तर आणखी एका प्रेक्षकाने अशी कमेंट दिली आहे की, ही जीजी अक्का सुधारणार आहे की नाही..
आता झाली ना कीर्ती आयपीएस.. तरीही चा पांचटपणा चालूच आहे.. काय फालतुगिरी दाखवतात.. मालिके सारखं सारखं तेच जीजी आक्काचा सासुरवास अतिशय बोगस आहे हे.. तर तिसर्या एका प्रेक्षकाने असे म्हटले आहे की आयपीएस सुनेला आशीर्वाद द्यायला लाज वाटते का? या अडाणी जिजीमुळे.. अशा कमेंट करून अनेक प्रेक्षकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.