Headlines

चाणक्य नीतीप्रमाणे या ३ गुणांनी परिपूर्ण पत्नीचा पती असतो भाग्यवान, जाणून घ्या !

लग्न म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातील एक सोहळा असतो. योग्य साथीदार निवडून त्याला आपल्या जीवनात आपला सखा सोबती म्हणून आणणारा क्षण म्हणजे लग्न असतो. परंतु सर्वात मोठी गोष्ट असते ती म्हणजे आपला योग्य सोबती निवडणं. काही वेळेस निवड चुकते आणि पुढे जीवनभर तो त्रास सहन करत दोघांना ही जगावं लागतं. आचार्य चाणक्य यांनी या विषयासंबंधी आपले मतं मांडले आहे.

आचार्य चाणक्य हे अनेक विषयांचे सखोल ज्ञान असलेले विद्वान होते. ग्रहांच्या जीवनाविषयीही त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. यामध्ये त्यांनी पत्नीच्या ३ विशेष गुणांचीही चर्चा केली आहे. चाणक्यानुसार, ज्या व्यक्तीच्या पत्नीमध्ये हे ३ गुण असतात, ती व्यक्ती खूप भाग्यवान असते. असे गुण असलेल्या स्त्रिया घराला स्वर्ग बनवतात. वैवाहिक जीवनातही कोणतीही अडचण येत नाही. चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत हे गुण.

धर्म आणि वेदांची जाण असणारी – आचार्य चाणक्य यांच्या मते पत्नीला धर्म आणि वेदांचे चांगले ज्ञान असले पाहिजे. तिची देवावर श्रद्धा असली पाहिजे. जर तिच्यात हे सर्व गुण असतील तर ती योग्य आणि अयोग्य फरक करू शकेल. या प्रकारची पत्नी संपूर्ण घराची चांगली काळजी घेते. घराचा मान व प्रतिष्ठा राखते. समाजात तो अभिमानाने वावरता येते. तिच्या मुलांना ती योग्य संस्कार देते. कुटुंबातील येणाऱ्या पिढीला योग्य मार्गदर्शन करते.

विनम्र असणारी – आचार्य चाणक्य यांच्या मते, स्त्री विनम्र बोलणारी हवी. ज्या व्यक्तीला अशी पत्नी मिळते तो भाग्यवान असतो. त्यांची पत्नी तिच्या चांगल्या वागण्याने आणि गोड बोलण्याने सर्वांची मने जिंकते. अशा स्त्रिया संपूर्ण कुटुंबाला सोबत घेऊन जातात. त्यांना तुटू देत नाही ना कधीही घरात भांडणे होऊ देत. घर आनंदाने भरलेले सते.

पैशांची योग्य आखणी करणारी – आचार्य चाणक्य मानतात की स्त्री अशी असावी जिने पैशांची, खर्चाची योग्य आखणी करावी ना की त्याचा नाश करावा. ज्या स्त्रीला पैसे वाचवण्याची सवय आहे, ती घरासाठी खूप भाग्यवान असते. कुटुंब बिकट परिस्थितीत अडकले असताना स्त्रीने वाचवलेले पैसेच उपयोगी पडतात. त्याचबरोबर स्त्रीला देखील तिच्या वैयक्तिक कामासाठी कुणासमोर हात पसरावे लागत नाहीत. तिला पाहून घरातील मुले आणि इतर सदस्यांनाही पैसे वाचवण्याची प्रेरणा मिळते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !