Headlines

तुझ्यात जीव रंगला !अखेर राणादा अन् अंजली बाईंचं जमलं; अक्षया-हार्दिकने गुपचूप उरकला साखरपुडा !

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका तुझ्यात जीव रंगलाने प्रेक्षकांचा निरोप घेऊन बराच काळ लोटला आहे. या मालिकेला आणि या मालिकेतील राणादा आणि अंजली बाईंची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली होती. मालिकेत राणादाची भूमिका अभिनेता हार्दिक जोशीने साकारली होती तर अंजली पाठकची भूमिका अभिनेत्री अक्षया देवधरने निभावली होती.

आता प्रेक्षकांसाठी एक खुशखबर आहे, तुमची ही लाडकी खऱ्या आयुष्यात पत्नी पत्नी होणार आहेत. हो, हे खरंय हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरचा नुकताच साखरपुडा पार पडला. या साखरपुड्याचे फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)


‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतलेला असला तरी राणा दा आणि अंजलीबाईंसाठीचं प्रेक्षकांचं प्रेम कमी झालेलं नाही. आता प्रेक्षक त्यांच्या लग्नसोहळ्याची आतुरतेनं वाट पाहत आहेत.

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील राणादा आणि पाठक बाईंच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. हार्दिक आणि अक्षया यांची जोडी प्रेक्षकांची अत्यंत आवडती जोडी होती. मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी या जोडीची जादू प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. या दोघांच्या खास नात्याची अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती , पण याबद्दल दोघांनीही कधी स्पष्टपणे सांगितलं नव्हतं परंतु आता या दोघांनी चाहत्यांना सुखद धक्का देत नवीन नात्याबद्दल सांगतिलं आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !