Headlines

‘तुझ्यावर कोणी ब*ला***र केला?’ अशी अ*श्ली*ल कमेंट करणाऱ्या व्यक्तीला ‘शालू’ अर्थात राजेश्वरी खरातने शिकवला चांगलाच धडा !

हल्लीच्या काळात सोशल मीडिया हे एक महत्त्वाचं साधन लोकांच्या हाती आलं आहे. क्षणात यावरून एखादा प्रसिद्ध होतो तर क्षणात एखाद्याला ब*द*ना*म ही करता येतं. सामान्य लोकांप्रमाणेच कलाकार, सेलिब्रिटीदेखील देखील या सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापरत करत असतात व सोबतच अनेक कलाकार या सोशल मीडियावर सक्रिय देखील आहेत. कलाकारांचे चाहते हे या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आवडत्या कलाकाराचा संपर्कात असतात.

कलाकारांच्या पोस्टवर कमेंट करणं, त्यांच्या स्टोरीला रिप्लाय करणं, अशा सर्व गोष्टी सुरु असतात. पण काही वेळेस कलाकारांना विनाकारण ट्रोल केलं जातं. त्यांच्या पोस्टवर उगीच अ*श्ली*ल अशा कमेंट केल्या जातात. प्रत्येकाला उत्तर देणं शक्य नसल्याने काही वेळेस कलाकार या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात पण आजकाल कलाकारांनी अशा ट्रोलर्सना तो*डी*स तो*ड उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. हल्ली अशीच एक घटना एका अभिनेत्रींसोबत घडली आहे.

प्रसिद्ध चित्रपट निर्माते नागराज मंजुळे यांच्या पहिल्या चित्रपटातील अभिनेत्री म्हणजे शालू. शालूचे खरे नाव राजेश्वरी खरात. फँ*ड्री या चित्रपटातली तिची भूमिका प्रेक्षकांच्या फारच पसंतीस उतरली. मराठी चित्रपटसृष्टीतील राजेश्वरी खरात हि एक अभिनेत्री असून तिला या चित्रपटामुळे फारच प्रसिद्धी मिळाली. बरेच जण तिच्या खऱ्या नावाऐवजी तिला शालू या नावानेच ओळखतात. चित्रपटामध्ये एका सध्या सोज्वळ मुलीची भूमिका साकारलेली राजेश्वरी हि प्रत्यक्ष जीवनात फारच सुंदर व ग्लॅमरस राहते. सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो पोस्ट करत ती नेहमी आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. तिचे चाहते देखील तिच्या पोस्टचे कौतुक करत असतात.

राजेश्वरी स्वतःचे बोल्ड आणि सुंदर फोटो हे सोशल मीडियावर पोस्ट करत असते. पण काही नेटकरी हे विनाकारण तिला ट्रोल करताना दिसत आहेत. तिच्या फोटोवर अ*श्ली*ल कमेंट करणे, तिची थ*ट्टा म*स्क*री उडवणे हे प्रकार सर्रास सुरु आहेत पण आता राजेश्वरीने स्वतः या नेटकारण्यां चांगल्याच भाषेत सुनावलं आहे. “तुझ्यावर कोणी ब***** केला आहे का?” असा अति विचित्र प्रश्न तिच्या कमेंट सेक्शनमध्ये एका नेटकऱ्याने विचारला, इतरांनी या प्रश्नाला विरोध दर्शवण्यापेक्षा स्वतः देखील या प्रश्नाद्वारे तिची थट्टा केली. हा विचित्र प्रकार पाहून राजेश्वरीचा संताप अनावर झाला अन तिने या नेटकारण्यां फार स्पष्ट शब्दात खडे बोल सुनावले.

राजेश्वरी संतापून म्हणाली, “हे अशी comment करणारे आणि त्यांना अशा प्रकारचे reply देणारे, तुम्ही कसे काय जन्माला येतात रे?? मनुष्य तुमच्यासारखे तरी नसतात, त्यांची लायकी खूप मोठी आहे तुमच्यापेक्षा. असला घा*णे*र*डा*पणा माझ्या post वर मला नकोय, आपल्या आई-वडिल, बहिण, भाऊ, यांना हे प्रश्न करा, ते नक्की उत्तरे देतील कारण संस्कार आई वडिलच देतात. किती हिम्मत म्हणजे एखाद्या मुलीच्या post वर अशा comments करणे, वाह आणि कोणी काही बोलत सुद्धा नाही यांना. ला*य*की आहे का रा*जे म*हा*रा*जां*चे profile photo ठेवायची. ब्ल*डी लु*ज*र ” अशा स्पष्ट व खाष्ट शब्दात राजेश्वरीने या सर्वांना उत्तर दिलं.

अशा अ*श्ली*ल कमेंट्स करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशीही मागणी काही नेटकऱ्यांद्वारे केली जात आहे. राजेश्वरीच्या या धाडसाचं सर्व सोशल मीडियावर कौतुक केलं जातंय. असा अ*श्ली*ल प्रकार घडत असल्यास इतर नेटकऱ्यांनी त्यांना प्रोत्साहन न देता या गोष्टीला आळा घालणं तितकंच महत्त्वाचं आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !