Headlines

‘त्या’ सीनमुळे ट्रोल झालेल्या प्राजक्ता माळीचं ‘हा’ नवीन सीन प्रदर्शित झाल्यावर कौतुक !

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरली आहे. तिच्या रानबाजार या आगामी वेब सीरिजमधील एका बोल्ड सीनमुळे ती ट्रोल झाली होती. रानबाजार मधील तिच्या भूमिकेचं होत असलं तरी देखील नेटकऱ्यांनी तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं होतं. तिचा बोल्ड अंदाज अनेकांना रुचला नाही. तिने तिच्या इंस्टाग्राम पेजवर त्या वेब सिरीजचा व्हिडीओ पोस्ट केला होता त्यावर कमेंट्स करत नेटकऱ्यांनी नाखुषी दर्शवली होती.

रानबाजार या मराठी वेब सिरीजमध्ये प्राजक्ता माळी सोबतच तेजस्विनी पंडित देखील आहे. तेजस्विनी याम्शय मुख्य भूमिकांमध्ये आपल्याला दिसणार आहे. या वेब सीरिजच्या टिझरला २४ तासांत १ मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले होते. प्लॅनेट मराठी ओटीटीवर ही वेब सिरीज सध्या गाजत आहे. १० भागांची असलेल्या या वेब सीरिजचे ८ भाग प्रदर्शित झाले आहेत.

रानबाजार वेब सीरिजच्या ८ व्या भागामध्ये प्राजक्ताच जबरदस्त काम आहे तो ८ वा भाग प्रदर्शित झाल्यावर प्राजक्ताने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याची पोस्ट केली आहे. त्या पोस्ट मध्ये तिने तिचे २ फोटो पोस्ट करता खाली कॅप्शनमध्ये लिहलं आहे, “जो scene माझ्या कारर्किदीतला one of the best scene आहे (अस फक्त मला नाही, अनेक जणांना वाटतय..) तो scene असलेला episode काल प्रदर्शित झाला… (one take one shot) 🎯#raanbaazaarजरूर बघा आणि प्रतिक्रिया द्या. @planetmarathiott 🎯” असं म्हणत तिनं तिच्या आवडत्या सीनविषयी तर सांगितले आहेच. शिवाय रानबाजार चे एकूण ८ भाग आलेत, फक्त २ राहिल्याची कल्पना देखील प्रेक्षकांना दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)


प्राजक्ताने पोस्ट केलेल्या या वेब सीरिजच्या प्रत्येक पोस्टवर नेटकऱ्यांनी वेळोवेळी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. तसंच या पोस्टवर देखील अनेकांनी कमेंट्स करत आपले मते नोंदवली आहेत. या कमेंट्समध्ये अनेकांनी तिच्या अभिनाय कौशल्याचं कौतुक केलं आहे.

१. यात फक्त आमची जीवाभावाची अभिनेत्री प्राजक्ता खूप आवडली आणि तिने केलेला मनापासून काम हीच तिची पोचपावती आहे. आताच्या अनेक अभिनेत्री या झाल्या परंतु प्राजक्ता माळी यांच्यासारखीच अभिनेत्री झाली नाही आणि होणार नाही.❤️❤️❤️😍🔥 २. उच्च दर्जाचा अभिनय आहे तूझा आणि खूप उत्तम वेब सिरीज 👏👏♥️🌹

३. प्राजू खरंच खूप उत्तम अभिनय तू या वेबसिरीजमध्ये केलंय..! आम्हाला fans ना आणि fan club’s ना तुझा खूप अभिमान वाटतो…तू चौकटी बाहेर जाऊन काही वेगळं केलंय खूप आनंद होतो आहे..खूप खूप शुभेच्छा…! 😍👏🔥🙌❤️❤️❤️ खरंच one of the best scene …🔥🔥#lotsoflove #prajuarmy अशा अनेक कमेंट करत प्रेक्षकांनी प्राजक्ता माळीचं कौतुक केलं आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !