Headlines

बाजीप्रभू यांनी जीवाची बाजी लावली त्या मातीत आपलं घर असावं म्हणून अजय पुरकर यांनी बांधलं विशाळगडाच्या पायथ्याला घर !

जूनला प्रवाह पिक्चरवर पावनखिंड सिनेमाचा प्रिमियर दाखवण्यात येणार आहे. पावनखिंड लढवणाऱ्या बाजी प्रभू देशंपांडे यांच्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात बाजी प्रभू यांची भूमिका अभिनेते अजय पूरकर यांनी साकारली होती. प्रत्येक कलाकार त्याच्या हाती आलेली भूमिका हा जीवंत करण्याचा प्रयत्न करत असतो. अजय पूरकर यांनी देखील पडद्यावर जणू काही बाजी प्रभू खरेच अवतरले आहेत अशी भूमिका साकारली होती. त्यांनी ही भूमिका खऱ्या अर्थाने जगली.

बाजीप्रभू यांच्यावर असलेल्या श्रद्धा आणि प्रेमापोटी अजय पूरकर यांनी चक्क विशाळगडाच्या पायथ्याशी घर बांधलं आहे. ज्या मातीत शिवरायांनी इतिहास घडवला. शिवरायांच्या, बाजी प्रभूंच्या अस्तित्वाची खूण ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी आपलं स्वत:च घर असावं अशी अजय यांची इच्छा होती. त्याची इच्छा आता पूर्ण झाली आहे. त्यांनी विशाळगडाच्या पायथ्याशी घर बांधलं आहे. अजयच्या नव्या घराचे फोटो सर्वत्र व्हायरल होत आहे. त्यात त्याच्या घराचे बांधकाम सुरु असलेले दिसते. लाल मातीत बांधलेलं घर छान दिसत आहे.

अजय पूरकर सध्या मुलगी झाली हो मालिकेत साजिरीच्या वडीलांची भूमिका साकारत आहे. यापूर्वी ते कलर्स मराठीवरील राजा राणीची गं जोडी या मालिकेत नकारात्मक पात्र साकारत होते. त्यांच्या कोड मंत्र नाटकाला एकाच वर्षात २४ पुरस्कार मिळाले. प्रेमाची गोष्ट, कदाचित, बालगंधर्व, फेरारी की सवारी, रिस्पेक्ट, फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड या चित्रपटांत त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !