Headlines

या कारणामुळे विधवा वहिनीशी लग्न करून दिराने दिला आधार, समाजापुढे ठेवला नवीन आदर्श !

संसारवेल फुलायला लागल्यावर ती अर्धवटच कोमेजली की आयुष्य भकास होऊन जाते. नवरा किंवा बायको यांच्यापैकी कोणाही एकाचे अर्ध्यातच दूर जाण्यामुळे संपुर्ण कुटुंब विस्कळीत होते. अशातच जर नवरा बायकोमधील नवऱ्याचे अ*क*स्मि*त निधन झाले किंवा नवऱ्याने बायकोला संसराच्या वाटेवर अर्धवट साथ दिली तर त्या महिलेवर दुखाचा डोंगर कोसळतो.

समाजात तिला वेगवेगळ्या नजरांना सामोरे जावे लागते. घरच्यांची व तिच्या मुलांची जबाबदारी तिला एकटीने पार पाडावी लागते. या सर्व परिस्थिती क्वचितच महिलांना तिच्या कुटुंबाचा सकारात्मक प्रतिसाद मिळतो. नाहीतर काही स्त्रियांचे आयुष्य अगदी भकास होऊन जाते.

पण धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील एका तरुणाने त्याच्या विधवा वहिनीसोबत लग्न करुन समाजापुढे एक आदर्श तयार केला आहे. जितेंद्र कल्लके असे या तरुणाचे नाव आहे. शिरपूर तालुक्यातील संतोष कल्लके यांचा मोठा मुलगा सुधाकर कल्लके यांच्याशी मनिषा हिचा ९ जुन २००९ मध्ये विवाह झाला होता. मात्र ८ वर्षांपुर्वी सुधाकर यांचे ह्र*दय*वि*का*रा*च्या झ*ट*क्या*ने निधन झाले. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी संतोष कल्लके यांच्यावर आली.

घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे विधवा सुने सह तिचा १२ व ५ वर्षांच्या मुली व ९ वर्षांचा मुलगा यांच्या भविष्याचे काय असा प्रश्न संतोष यांना भेडसावु लागला. त्यानंतर जवळचे काही नातेवाईक व गावातील काही प्रमुख व्यक्तींशी बातचित करुन मनिषाचा विवाह घरातील लहान अविवाहित मुलगा जितेंद्र सोबत लावुन देण्याचे ठरवले. या प्रस्तावाला मनिषा व जितेंद्र यांनी सुद्धा होकार दिला. तोच प्रस्ताव मनिषाच्या माहेरी सुद्धा मांडण्यात आला व तेथुन सुद्धा या विवाहासाठी संमती मिळाली. आणि मग काय २२ जुलै रोजी नागेश्वर येथे वैदिक पद्धतीने हा विवाहसोहळा संपन्न झाला.

जितेंद्र यांनी सर्वाच्या साक्षीने व स्वखुषीने मनिषा व तिच्या तिन्ही मुलांना स्विकारले. सध्या सर्वत्र कोरोनाचे सावट असल्यामुळे या विवाहाला साधेपणाने हा विवाह करण्यात आला. मनिषा व जितेंद्र हे दोघेही उच्चशिक्षित आहे. लग्नात मनिषाचे कन्यादान तिचे वडिल अशोक चव्हाण यांनी केले. या लग्नात शिरपुर येथील नगरसेवक , व इतर काही महत्वाच्या मोठ्या व्यक्तीसुद्धा उपस्थित होत्या.

मोठ्या भावाच्या अचानक निघुन जाण्याने त्याच्या मुलांच्या डोक्यावरील पितृछायेचे छप्पर हरवले होते. ते मी त्यांना नक्कीच देण्याचा प्रयत्न करीन असे नवरदेव जितेंद्र यांनी म्हटले.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !