Headlines

रंग माझा वेगळा मालिकेचा रंग उडाला, बालकलाकार साईशा भोईरने सोडली मालिका, जाणून घ्या कारण !

कोणतीही मालिका असो वा चित्रपट त्यात मुख्य पात्रांसोबत जर बालकलाकारसुद्धा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात. सध्या मराठी मालिकांमधील बालकलाकार सोशल मीडियावर खूप हिट आहेत. त्यातीलच एक म्हणजे रंग माझा वेगळा या मालिकेतील बालकलाकार साईशा भोईर. साईशाचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. पण साईशाच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे.

साईशाने रंग माझा वेगळा ही मालिका सोडली आहे. साईशाला एका मोठ्या प्रोजेक्टची ऑफर आल्याने तिने ही मालिका सोडल्याचे बोलले जाते. रंग माझा वेगळा या मालिकेच्या टीमकडूनही तिच्या या निर्णयाला ग्रीन सिग्नल मिळाला आहे.
साईशाने ही मालिका सोडल्याने तिच्या जागी कोणती नवी कार्तिकी येणार याची उत्सुकता मालिकेच्या चाहत्यांमध्ये असेल हे नक्की.

शिवाय साईशा आता कोणत्या चित्रपटात पाहायला मिळणार त्यात तिची भूमिका कोणती असणार हे प्रश्न तिच्या चाहत्यांना पडत आहेत. तिच्या अशा अचानक मालिका सोडण्यामुळे सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली जात आहे. ‘तिने का सोडली मालिका?’, ‘तिच्याशिवाय मज्जाच नाही’, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. तर काहींनी अशा कमेंट केल्या आहेत की, मालिकेच्या रटाळ कथानकामुळे तिने मालिका सोडली आहे.

सोशल मीडियावर साईशाचे व्हिडिओ नेहमीच चर्चेत असतात. अगदी लहान वयात तिला मिळालेलं यश हा चर्चेचा विषय होता. साईशाचे सोशल मीडियावर ९१ हजारांहून अधिक फॉलोवर्स आहेत. साईशाने काही दिवसांपूर्वी एका नामांकित ब्रँडसाठी रॅम्पवॉक केले होते. साईशाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नृत्य, अभिनय, जेवण बनवतानाचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. तिच्या प्रत्येक व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !