रानबाजार वेबसेरीजच्या अफाट यशानंतर प्राजक्ता माळीने केला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा !,

bollyreport
3 Min Read

सध्या मराठी चित्रपट जोरदार गाजत आहेत. जणू मराठी चित्रपटांची सिरीजच सुरु असल्यासारखे एकामागोमाग एक दर्जेदार आणि बॉक्स ऑफिस ठरणारे मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. प्रेक्षक देखील या चित्रपटांना भरघोस असा प्रतिसाद देत पहिल्याच दिवशी हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरत आहेत. अनेक मराठी आगामी चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी तयार होत आहेत. पावनखिंड, शेर शिवराज, चंद्रमुखी, धर्मवीर, सरसेनापती हंबीरराव, झोंबिवली हे चित्रपट हाउसफुल शो होत हिट ठरले. आगामी चित्रपटांच्या चर्चेला देखील उधाण आहे.

मराठीतील ‘वाय’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अनेक कलाकरांना आपल्याला एकत्र पाहायला मिळणार आहे. मुक्त बर्वे, प्राजक्ता माळी, ओंकार गोवर्धन, संदीप पाठव, रसिका चव्हाण, सुहास शिरसाट, नंदू माधव असे कलाकार या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये आपल्याला दिसणार आहेत. एका सत्यघटनेवर आधारित असलेला ‘वाय’ हा चित्रपट २४ जूनला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

या चित्रपटाच्या पोस्टर, टिझर, ट्रेलरपासूनच या चित्रपटाच्या बातम्यांना उधाण आलं आहे. अजित सूर्यकांत वाडीकर दिग्दर्शित या चित्रपटातील गूढ जाणून घेण्याची इच्छा अधिकच तीव्र होऊ लागली आहे. वायचे पोस्टर हातात धरून अनेक मान्यवरांनी या चित्रपटाला पाठिंबा दिला. कंट्रोल एन प्रॅाडक्शन निर्मित या चित्रपटाची पटकथा आणि संवाद अजित वाडीकर यांचेच आहेत. या चित्रपटासंबंधित प्रसार माध्यमांशी बोलताना अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही खुलासा केला.

मराठी वेबसिरीज ‘रानबाजार’ मधील बोल्ड सीनमुळे गेले अनेक दिवस प्राजक्ता चर्चेत आहे आणि या बोल्ड भुमिकेमुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रॉल देखील केले. तिच्या ‘वाय’ या आगामी चित्रपटासाठी ती मुलाखत देत असताना ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा करत म्हणाली, “‘वाय’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान प्राजक्ताचा ब्रेकअप झाला होता, ही माहिती तिने दिली आहे. मी कुठे आहे, माझं काय सुरु आहे, याची मला काहीही कल्पना नव्हती. या चित्रपटाच्या शूटींगदरम्यानच्या अनेक गोष्टी मला नीट आठवतही नाहीत”, असेही प्राजक्ता म्हणाली.

“आम्ही जेव्हा हा चित्रपट पाहात होतो, तेव्हा मला चित्रपटाचे दिग्दर्शक आठवण करुन देत होते की तू हा सीन करताना पडली होती. तू हा सीन करताना हे असं असं बोलली होतीस, तुला आठवतंय का? त्यांनी मला हे प्रश्न विचारल्यावर मी फक्त हो असे म्हणत होती. पण मला त्यावेळी या गोष्टी अजिबात आठवत नव्हत्या. त्यावेळी मी माझ्याच विचारात गुंतलेली होते”, असे प्राजक्ताने सांगितले.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.