Headlines

विधवा भावजई सोबत धाकट्या दिराने बांधली लग्नगाठ, समाजातून होतंय कौतुक !

जग सध्या खुप पुढे जात आहे. या जगात सध्य स्थितीत स्त्रिया स्वताच्या पायावर खंबीर उभ्या राहिल्या शिकल्या आहेत. आणि महत्वाचे म्हणजे या सर्वात स्त्रीयांच्या पाठी त्यांच्या घरातले पुरुष खंबीरपणे उभे आहेत. आयुष्यात कितीही खाचखळगे आले तरी कोणाचा तरी आधार असला तर आपण त्यातुन नीट उभे राहु शकतो. मग तो आधार वडिलांचा असो, भावाचा असो , नवऱ्याचा असो किंवा दिराचा..

बुलढाण्यात नेमके असेच एक प्रकरण घडले. दोन लहान मुलांची आई असलेल्या नंदा दामधरच्या आजारात खिळलेल्या नवऱ्याचे निधन झाले आणि त्यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला. पण त्यांच्या कठिण प्रसंगात त्यांचा दिर त्यांना खांदा द्यायला धावुन आला. त्यांच्या या निर्णयाला त्यांच्या घरच्यांनी व समाजाने देखील पाठिंबा दिला आहे.

भावाचे अचानक निघुन जाण्याने त्याच्या पत्नी व मुलांचा आसरा निघुन गेला होता. त्यावेळी हरिदासने पुढे येऊन त्याच्या मनाचा मोठेपणा दाखवला. व भावजय सोबत लग्न केले. त्यांच्या या लग्नाला अनेकांनी शुभाशिर्वाद दिले. व लग्न थाटात पार पडले.

आपला देश कितीही पुढे गेला असला तरी अजुनही विधवा पुर्नविवाहाला तितकीशी मान्यता नाही. पण तरीही दामधर कुटुंबाने समाजाचा विचार न करता त्यांच्या सूनेला नवे आयुष्य देण्याचा विचार केला. या अनोख्या लग्न सोहळ्यामुळे हरिददास व त्यांच्या कुटुंबियांचे सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !