Headlines

सीईटीचा क्लासवरून घरी येताना तरुणीचा अपघाती मृत्यू, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातीय !

नाशिक येथे झालेल्या हृदयद्रावक अपघाती घटनेने सर्वच जण हळहळले आहेत. नाशिक येथे सीईटीचा क्लास संपवून एक घरी येत असताना एका तरुणीचा अपघाती मृत्यू झाला आहे. क्लासवरून घरी जात असतानां त्या मुलीची दुचाकी समोरच्या टेम्पोला धडकली आणि भीषण अपघात झाला. तिच्यासोबत अजून दोन मुली देखील होत्या. त्या दोघी जखमी झाल्या आहेत. पोलिसांच्या व स्थानिकांच्या मदतीने त्या दोघीना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

नांदूर शिंगोटेच्या भोजापूर खोरे परिसर चास येथील तीन तरुणी संगमनेर येथून सीईटीचा क्लासवरून दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घरी निघाल्या होत्या. रस्त्यात त्या जात असतानाच खंडोबा परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोवर त्याची भरधाव येणारी दुचाकी धडकली आणि भीषण अपघात झाला. या दुचाकीच्या अपघातामध्ये साक्षी अनिल खैरनार या वीस वर्षीय तरुणीचा अकाली मृत्यू झाला आहे. सोबत असलेल्या दोन तरुणी सविता आणि वर्षा या दोघींना संगमनेर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहेत.

साक्षी खैरनार हिच्या मृत्यूने तिच्या कुटुंबीयांसोबतच संपूर्ण तालुका हळहळला आहे. तिने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती आणि पुढील महाविदद्यालयीन शिक्षणासाठी तिने सीईटीचा क्लास लावला होता. यासाठीच ती व तिच्या २ मैत्रिणी संगमनेर येथील सीईटी क्लासला गेल्या होत्या आणि तेथून परतत असतानाच त्यांचा भीषण अपघात झाला.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !