सध्या स्टार प्रवाह वरील सर्वच मालिकांनी जोर धरलेला दिसुन येतो. टिआरपीच्या स्पर्धेत पण इतर वाहिन्यांना मागे टाकत स्टार प्रवाह वरिल मालिका अग्रेसर आहेत. त्यामुळेच या मालिकांमधील कलाकारदेखील लाईमलाईट मध्ये असतात. स्टार प्रवाहवर सध्याकाळी साडेसहाला लागणारी स्वाभिमान शोध अस्तित्वाचा ही मालिका सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. सध्या या मालिकेत प्रेमाचे वारे वाहताना दिसत आहेत. स्वाभिमान या मालिकेत सध्या शांतनु आणि पल्लवी मध्ये हळुवार प्रेम फुलत आहे.
शांतनु जसा त्याच्या पल्लवीवर प्रेम करतो त्याचप्रमाणे आपल्यावर देखील आपल्या जोडीदाराने प्रेम करावे अशी इच्छा सध्या मुली मनोमन बाळगत आहेत. पण मंडळी पडद्यावर जसे दिसते तसेच खरे असते असं नाही. छोट्या पडद्यावर चॉकलेट बॉय म्हणुन वावरणाऱ्या अक्षर कोठारी या अभिनेत्याच्या आयुष्यात मात्र अनेक वादळे येऊन गेली.
एका मुलाखतीत अक्षरने त्याचे वाईट अनुभव शेअर केले. अक्षर म्हणाला कि २०१९ हे वर्ष त्याच्यासाठी खुपच खडतर होते. अक्षरचा भाऊ अमोद कोठारी हा एक स्पेशल चाईल्ड आहे. २०१९ मध्ये त्याला एरिथमिया म्हणजेच ह्रदयाच्या अनियमित ठोक्याचा आजार झाला होता. त्याला काही होईल या भीतीने मी अनेक रात्री जागुन काढल्याचे अक्षरने सांगितले. शिवाय त्याच वर्षी माझी पत्नीसुद्धा माझ्यापासुन विभक्त झाली. त्यामुळे तो काळ माझ्यासाठी फारच भयानक होता.
अक्षरने पुढे सांगितले की पडद्यावर हसऱ्या दिसणाऱ्या कलाकाराचं आयुष्य खऱ्यामध्ये पण तितकच सहज सोप्प असतं असे नाही. कलाकाराला जगासमोर वावरताना त्याच्या खाजगी आयुष्यात काय घडते याची पर्वा न करता वावरावे लागते. छोटी मालकिण मालिकेत काम करत असताना माझा भाऊ हॉस्पिटलमध्ये खुप कठीण काळातुन जात होता. पण मी हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तिथला स्टाफ माझ्यासोबत सेल्फी काढण्यात व्यस्त असायचा. त्यावेळी मला मी अभिनेता असायची जाणीव व्हायची. टिव्हीवर दिसणारा अभिनेता हा नेहमी हसतमुखच असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते.
माझ्य़ा आय़ुष्यातल्या या गोष्टींमुळे मला चांगला कलाकार घडवले. प्रत्येक कलाकार हा या दुखातुन गेलेला असतो त्यामुळेच पुढे जाऊन तो चांगला अभिनेता बनतो. अभिनेता बनण्याचा निर्णय हा माझा होता. पण या क्षेत्रात येण्यासाठी मला माझ्या कुटुंबाने खुप मदत केली. पण त्यासाठी मी त्याच्या परवानगीची ५ वर्षे वाट पाहिली. भावाला गमावणे माझ्या कुटुंबासाठी खुप कठीण होते. पण आयुष्यातला हा मला आणि माझ्या कुटुंबासाठी प्रेरक आहे.
बंध रेशमाचे या मालिकेतुन अक्षरने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर त्याने आराधना, छोटी मालकीण, चाहुल २ या मालिकेत काम केले. चाहुल २ मधील त्याची सर्जा मालिका खुप गाजली. या मालिकेत अक्षरची पत्नी अभिनेत्री मानसी नाईकने सर्जेरावची पत्नी मंदाकिनीची भुमिका साकारल्या होती. त्यामुळे खऱ्या आय़ुष्यातले हे कपल ऑनस्क्रिनसुद्धा हीट ठरले.
ललित २०५ , गणपती बाप्पा मोरया, तु माझा सांगाती, स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेतुन मानसी नाईकने काम केले होते. पण काही कारणास्तव २०१९ मध्ये अक्षर आणि मानसीचा घ’ट’स्फो’ट झाला. त्यानंतर तिने २७ मे २०२९ ला मानसीने ध्रुवेश कापुरियासोबत दुसरे लग्न केले.