Headlines

रामायण मधील सीता आत्ता काय करते बघा, आणि पहा तिचे आत्ताचे फोटोज !

सध्या कोरोना मुळे संपूर्ण देश २१ दिवसांसाठी लॉक डाऊन करण्यात आला आहे. २१ दिवस घरात बसून करायचे काय हा प्रश्न देशातील प्रत्येक नागरिकाला सतावत होता. त्यामुळे पूर्वी दूरदर्शनवर गाजलेल्या काही मालिकांचे पुन्हा प्रक्षेपण करण्याचे सरकारने ठरवले. आणि महाभारत रामायण शक्तिमान यांसारख्या नव्वद आणि ऐंशीच्या दशकात गाजलेल्या मालिका पुन्हा दूरदर्शन वर प्रक्षेपित होऊ लागल्या.

रामायण मालिका चालू झाल्यापासून या मालिकेच्या चाहात्यांनी वेगवेगळ्या कमेंट द्वारे मालिके संबंधी आठवणी पुन्हा जाग्या केल्या आहेत. प्रेक्षक म्हणतात की पूर्वी रामायण मालिकेच्या वेळी घराची वीज जायची त्यावेळी आम्ही चप्पल न घालता ज्या घरात वीज आहे त्या घरी रामायण पाहण्यासाठी पळायचो.

रामायण मधील कलाकार आजही आमच्या मनात घर करून आहेत. प्रेक्षक म्हणतात की लहानपणी आम्ही रविवार ची आतुरतेने वाट बघायचो पण ही वाट घरात आराम करायला मिळेल यासाठी नव्हे तर घरी परिवारासोबत बसून आम्ही रामायण सिरीयल बघू शकू.

१९८७ मध्ये रामानंद सागर निर्मित रामायण ही मालिका सुरू झाली. रामायण मालिकेतील पात्र भलेही कलाकार असतील मात्र प्रेक्षक त्यांना देवाच्या जागीच मानायचे. रामायण मालिकेत रामाची भूमिका अरुण गोविल यांनी साकारली होती तर हनुमानाच्या रूपात दारासिंह दिसले होते आणि सीता मातेच्या रूपात दीपिका चिखलिया या अभिनेत्रीने काम केले होते. या तिघांनी साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षक विसरलेले नाहीत.

आज आपण सीता मातेचे रूप साकारलेल्या दीपिका चिखलिया बद्दल बोलूयात. त्यावेळी सर्वांना दीपिका साक्षात खरीखुरी सिताच वाटू लागली होती. या मालिकेच्या चित्रिकरणा वेळी दीपिकाचे वय खूपच कमी होते. दीपिकाने या भूमिकेनंतर टीव्ही इंडस्ट्रीला पूर्णविराम दिला.

आता त्या वेळेचा प्रेक्षक विचार करत असेल की रामायण वाली सीता आता कुठे आहे आणि ती आता कशी दिसत असेल? याचे उत्तर आम्ही तुम्हाला देतो. रामायण मधील सीता म्हणजेच दीपिका चिखलिया आता एक बिझनेस वुमन झाली आहे. ती आता तिच्या पतीच्या कॉस्मेटिक कंपनीमध्ये रिसर्च मार्केटिंग हेड आहे.

ही मालिका संपल्यावर दिपीकाने कॉस्मेटिक कंपनीचे मालक हेमंत टोपीवाला सोबत लग्न केले आणि त्यानंतर ती परिवार आणि तिच्या कामांमध्ये व्यस्त झाली. रामायणातील तिचा सीतेचा अभिनय पाहून अनेक निर्माता दिग्दर्शकांच्या अनेक मालिकांच्या ऑफर आल्या होत्या पण दीपिकाने त्या स्वीकारल्या नाहीत.

रामायण मालिकेनंतर तिने काही चित्रपटांमध्ये काम केले. दीपिकाला आता २ मुली आहेत. ती हल्ली अधिकतर वेळ परिवार आणि तिच्या बिझनेस मध्येच घालवते.
लेख आवडला असेल तर लाईक आणि शेयर करा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *