भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना या बॉलिवुड अभिनेत्याला डेट करू इच्छिते ! 

23925

बॉलिवुड आणि क्रिकेटचा संबंध तसा खूप जुना आहे. भारतीय क्रिकेट टीमच्या अनेक स्टार क्रिकेटर्स नी बॉलिवुड अभिनेत्रींसोबत लग्न केले आहे. जसे की, भारतीय संघाचा कॅप्टन विराट कोहली ने बॉलिवुड अभिनेत्री अनुष्का शर्मा सोबत लग्न केले. युवराज सिंह ने हेजल किच सोबत लग्न केले असे अनेक खेळाडू आहेत.

स्मृती मंधाना ही भारतीय महिला क्रिकेट संघाची एक उत्कृष्ठ फलंदाज आहे. महिला क्रिकेट विश्वात तिच्या फलंदाजीचे अनेक चाहाते आहेत. आज आम्ही तुम्हाला स्मृती मंधाना बद्दल काही खास गोष्टी सांगणार आहोत. सध्या स्मृती एका बॉलिवुड अभिनेत्याच्या प्रेमात पडली आहे. हा बॉलिवुड अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे टायगर श्रॉफ. टायगर श्रॉफ ने आतापर्यंत बॉलिवुड मध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. शिवाय त्याच्या डान्स चे सुध्दा अनेक चाहते आहेत.

स्मृतीला टायगर आवडत असल्याचा खुलासा तिने एका प्रायव्हेट न्युज चॅनल ला दिलेल्या मुलाखती दरम्यान केला. या मुलाखतीत स्मृती सोबत तिचे व क्रिकेटचे असलेले संबंध तसेच तिच्या वैयक्तिक आयुष्यावर चर्चा केली गेली होती.
या मुलाखतीत स्मृतीला विचारले गेले की ती बॉलिवुड मधील कोणत्या कलाकाराला डेट करू इच्छिते यावर स्मृतीने उत्तर दिले की ती बॉलिवुड अभिनेता टायगर श्रॉफ ची खूप मोठी चाहाती आहे. जर टायगर ने परवानगी दिल्यास ती नक्कीच त्याला डेट वर घेऊन जाईल.

टायगरचा नुकताच श्रद्धा कपूर सोबतचा बागी ३ हा चित्रपट प्रदर्शित झाला. तसेच हिरोपंती २ आणि रॅंबो या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असून ते प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत.
लेख आवडला असेल तर लाईक आणि शेयर करा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.