भारत-चीन या दोन देशातील तणावाच्या वातावरणामुळे भारत सरकारने चिनी बनावटीच्या ५९ ॲप वर बंदी घातली आहे. या ५९ मध्ये सध्या सर्वात जास्त पॉप्युलर असलेल्या टिक टॉक या ॲप चा सुद्धा समावेश आहे. या ॲप वर बंदी घातल्यामुळे या निर्णयाबाबत काही ठिकाणी नाराजीचे सूर व्यक्त होत आहेत तर काही ठिकाणांहून या निर्णयाचे स्वागत केले आहे. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील जामधे या आदिवासी खेड्यातील रहिवासी दिनेश पवार यांनी टिक टॉक ॲप बंद केल्यामुळे नाराज झाले आहेत.
९० च्या दशकातील बॉलिवूड गाण्यांमध्ये पवार आणि त्यांच्या दोन पत्नींनी डान्सचे व्हिडिओ करून टिक टॉक वर पोस्ट केले होते. त्यांच्या या डान्सच्या व्हिडिओंमुळे त्यांचे ३० लाखांहून अधिक फॉलोवर्स होते. पवार यांचे म्हणणे आहे की या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना पैसे जरी कमवता आले नसले तरीही स्टारडम काय असते याची चव चाखण्यास मिळाली. सर्वप्रथम ही बातमी माझ्या दोन्ही बायकांनी वाचली. ती वाचल्यावर आम्ही खरच खूप खचून गेलो पण नंतर असे समजले की यामध्ये फक्त आम्हीच नव्हतो तर अजूनही काही लोक खचले होते.
टिक टॉकवर अचानक बंदी आणल्यामुळे आमच्यासारख्या कोट्यावधी लोकांना त्रास होत आहे. पण आम्ही आमचे टॅलेंट या माध्यमापुरते मर्यादित न ठेवता आता ते युट्युब मार्फत लोकांसमोर आणण्याचा आम्ही निर्णय घेतला असल्याचे पवार यांनी सांगितले. जामधे येथे राहणाऱ्या प्रकाश चव्हाण यांचे म्हणणे आहे की, टिक टॉक बंद होण्याचे दुःख हे फक्त पवारांनाच नव्हे तर गावामध्ये असणाऱ्या इतर ११ जोडप्यांना सुद्धा झाले आहे कारण त्यांनी नुकतेच टिक टॉक वर व्हिडिओ बनविण्यास सुरुवात केली होती.
सध्या या जोडप्याने स्वतःला घरात बंद करून घेतले आहेत. पूर्वी ते टिक टॉक वर व्हिडिओ बनवण्याचा निमित्ताने बाहेर यायचे. पण आज ते अजिबात आलेले नाहीत. ही बातमी ऐकल्यावर मी स्वतः रडलो पण मला जेव्हा कळले की या ॲप मार्फत भारताकडून चीन कोट्यावधी रुपयांची कमाई करत आहे त्यावेळी आम्ही भारत सरकारला पाठिंबा देण्याचे ठरवले. पण माझी भारत सरकारला विनंती आहे की त्यांनी टिक टॉक सारखे भारतीय बनावटीचे ॲप आणायला हवेत.
मुंबईपासून ३५० किलोमीटर अंतरावर असलेल्या जामधे या गावात असंख्य पवनचक्क्या, खुले शेत आणि लहानमोठ्या टेकड्या आहेत. त्यामुळे टिक टॉक वर व्हिडिओ बनवताना व्हिडिओ साठी लागणारे उत्तम बॅकग्राऊंड येथे मिळते. जामधे येथे राहणारे रहिवासी असून त्यांना ब्रिटिशांच्या राजवटीत अत्यंत हलाखीच्या परिस्थितीचा सामना करावा लागला होता. जामधे गावचे सरपंच गोपी सोपान भोसले यांनी सांगितले की हे अत्यंत मागासलेले गाव आहे. आतापर्यंत या गावातील फक्त पाच मुलगे आणि एका मुलीने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. आणि उर्वरित नागरिक एकतर अशिक्षित आहेत किंवा त्यांचे प्राथमिक पर्यंतच शिक्षण झालेले आहे. पुढे त्यांनी सांगितले की या गावात एक सरकारी शाळा आहे परंतु येथे फक्त ५ वी पर्यंतचे शिक्षण दिले जाते. पुढील अभ्यासासाठी मुलांना २० किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळेत जावे लागते.
पवार यांनी सांगितले की त्यांनी युट्युब मार्फत व्यापाराच्या पद्धती शिकून घेतले आहेत. आमच्या गावावर नेहमीच बॉलिवूडचा प्रभाव आहे. त्यामुळेच माझ्या आजीने माझे नाव अजय देवगन च्या दिलजाले या चित्रपटाच्या शक या पत्रावरून ठेवले. आजही आम्ही आमच्या गावातील काही मंडळींना ऋषी कपूर, मिथुन, सनीदेवल ,शशि कपूर अशा नावांने हाक मारतो.
टिक टॉक, व्हिमेट, लाईक आणि यांसारख्या अन्य अॅपवर दररोज दोन तीन व्हिडिओ अपलोड करणाऱ्या चव्हाण यांनी त्यांच्या आईचे सोन्याचे कानातले विकून १४ हजार रुपयांचा एक फोन विकत घेतला. चव्हाण यांचे टिक टॉक वर दोन लाखांहून अधिक फॉलॉवरस आहे. तर पवार हे गावातील सलून मध्ये काम करायचे. 32 वर्षीय पवारांनी टिक टॉक वर व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. त्यानंतर या माध्यमातून त्यांना प्रसिद्धी मिळत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी १७०० रुपयांचा अँड्रॉइड फोन विकत घेण्यासाठी त्यांच्या काही शेळ्या विकल्या.
सुरुवातीला ते विनोदी व्हिडीओ बनवायचे त्यामध्ये त्यांना जास्त काही प्रतिसाद मिळाला नाही त्यानंतर त्यांनी त्यांच्या दोन पत्नींसोबत ९० च्या दशकातील हिट बॉलीवूड गाण्यांवर डान्स करून व्हिडिओ अपलोड करण्यास सुरुवात केली. या व्हिडिओमुळे काही वेळातच लाखो फॉलोवर्स त्यांनी कमावले. त्यांचे व्हिडिओ आता टिक टॉक पासून फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागले आहेत.
पुढे त्यांनी सांगितले की या ॲपवर भेटलेल्या अनेक अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या तीन वर्षाच्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि पत्नीच्या औषधासाठी मदत केली. दरम्यान पवार यांनी दोन महिन्याच्या कालावधीत व्हिमेट या अॅप मार्फत एक लाख रुपये कमवल्याचे म्हटले जाते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !