अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला आता दोन आठवड्याहून अधिक काळ उलटला आहे मात्र तरीही अजूनही त्याचे फॅन्स त्याच्या मृत्यूमुळे शो का त वावरत आहेत. सुशांत सिंह राजपूत ने घेतलेल्या टोकाच्या पावलामुळे सर्वच क्षेत्रातून त्याच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली जात आहे. सुशांतने त्याच्या सात वर्षाच्या करियर मध्ये दहा चित्रपटांमध्ये काम केले होते. त्याच्या करिअरमध्ये क्रिकेट या खेळाने महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.
सुशांतने २०१३ मध्ये ‘काय पो चे’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात तो एका क्रिकेटची भूमिका साकारत होता ज्याला त्याच्या क्षेत्रातील एका टॅलेंटेड मुलाला क्रिकेटर बनवायचे होते. त्यानंतर तीन वर्षांनी सुशांत कडे नीरज पांडे यांचा एक मोठा प्रोजेक्ट आला ज्यामध्ये टीम इंडियाचा लोकप्रिय क्रिकेटर एम एस धोनी यांची भूमिका सुशांतला साकारायची होती.
ही भूमिका मिळावी यासाठी सुशांतने खूप प्रयत्न केले होते तो सतत चित्रपट दिग्दर्शक नीरज पांडे यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असायचा व त्याला या चित्रपटात लीड रोल देण्यासाठी विनंती करायला. याबद्दल बोलताना दिग्दर्शक नीरज पांडे यांनी सांगितले होते की, सुरुवातीला या चित्रपटासाठी अक्षय कुमारचा विचार करण्यात आला होता. मात्र १६ – १७ वर्षांच्या तरुण धोनीची भूमिका अक्षयला साकारता आली नसती यासाठी त्याला या चित्रपटासाठी निवडले नाही. या व्यतिरिक्त नीरज यांनी हे सुद्धा सांगितले की सुशांतने धोनीची बॉडी लैंग्वेज खूप उत्तम प्रकारे पकडली होती.
धोनी बनण्यासाठी सुशांत खूप मेहनत करायचा हा चित्रपट बॉलीवूड मधील सगळ्यात जास्त रियालिस्टिक क्रिकेट बायोपिक आहे. एम एस धोनी नंतर अक्षयने नीरज यांच्यासोबत शबाना आणि रुस्तम यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. आधी अक्षयने स्पेशल २६ मध्ये सुद्धा नीरज सोबत काम केले.
हे वाचा – विराट कोहलीने अनुष्का शर्माला कधीच लग्नाची मागणी घातली नाही, विराटने केला खुलासा !
याशिवाय असेही म्हटले जाते की अक्षयने त्याच्या बायोपिक साठी सुशांत चे नाव सुचवले होते. त्याने सुशांतचा काय पो चे आणि आणि शुद्ध देसी रोमान्स हे दोन्ही चित्रपट पाहिले होते या मधील सुशांत चे काम त्याला खूप आवडले तसेच त्याचा व सुशांतचा बॉलीवूड पर्यंत येण्याचा प्रवास हा खूप मिळता-जुळता होता. सुशांतचा एम एस धोनी वरील बायोपिक ब्लॉकबस्टर ठरला. एक सोलो हिरो म्हणून सुशांतच्या करिअरमधील हा पहिलाच चित्रपट शंभर कोटी क्लबमध्ये सहभागी झाला होता.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !
tag – ms dhoni biopic akshay kumar sushant rajput