Headlines

अख्या बॉलिवूड स्टार कीड विरोधात बोलणारी ‘कंगना राणावत’ कोण, कुठून आलीय, जाणून घ्या !

जबरदस्त अभिनय कौशल्य आणि बोल्डपणामुळे अभिनेत्री कंगना राणावतने बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान पक्के केले. कंगनाने गॅं ग स्ट र या चित्रपटातून तिच्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर तिच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. इंडस्ट्रीमध्ये कंगना तिचा बिंदास अटीट्युड आणि बोल्डनेस मुळे ओळखली जाते. अभिनेत्री कंगना राणावत चा जन्म हिमाचल प्रदेशातील मंडी येथील सूरजपुरमध्ये २३ मार्च १९८७ ला झाला.‌
तिचे फॅमिली बॅकग्राऊंड खूप चांगले होते, कंगनाचे आजोबा आयइएस अधिकारी होते तर वडील बिझनेस मॅन आणि आई शिक्षिका होती. कंगणाला रंगोली आणि अक्षत अशी भावंड सुद्धा आहेत. कंगनाचा स्वभाव लहानपणापासूनच खूप जिद्दी होता पण पुढे जाऊन हा जिद्दी स्वभाव तिला फार उपयोगी आला. कंगनाचे कुटुंब सुद्धा सर्वसाधारण कुटुंबाप्रमाणेच होते ज्यामध्ये मुलींनी शिकून लग्न करून सेटल व्हावे अशी विचारणधारणा त्यांच्या कुटुंबात देखील होती.
कंगणा लहानपणी अभ्यासात खूप हुशार असल्यामुळे तिच्या आई-वडिलांना तिने डॉक्टर बनावे असे वाटत होते. पण पुढे ती केमिस्ट्री या विषयात नापास झाली त्यामुळे ती डॉक्टर बनवण्याचा विचार मनातून काढून टाकला. त्यानंतर तिने पिएमटीची तयारी चालू केली पण त्या परीक्षेला ती बसली नाही त्यामुळे तिच्या घरचे तिच्यावर नाराज झाले. स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करून दाखवायचे व स्वतःला सिद्ध करायचे असे ठरवले आणि वयाच्या १६ व्या वर्षी तिने घर सोडले व दिल्लीला आली. इथपर्यंत करिअर कशात करायचे हे तिने निश्चित केले नव्हते. पुढे अचानक ती एका मॉडेलिंग एजन्सी च्या संपर्कात आली. काही काळ मॉडेलिंग केल्यानंतर यात फारसे काही शिकायला मिळत नाही असे तिला जाणवले. त्यानंतर तिने संपूर्ण लक्ष अभिनयावर केंद्रित करण्याचे ठरवले.
कंगनाने थिएटर दिग्दर्शक अरविंद गोवरजी यांच्याकडून अस्मिता ट्रेनिंग ग्रुपमध्ये ट्रेनिंग घेतली. त्यानंतर तिने अनेक नाटकांमध्ये काम केले. एका नाटकात कंगनाने पुरुष व्यक्तिरेखा सुद्धा साकारली होती त्यासाठी तिचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले होते. या काळात दिग्दर्शक अरविंद गोवरजी यांनी तिला खूप सपोर्ट केला आणि तू बॉलिवूडमध्ये पण काम करू शकतेस असा आत्मविश्वास तिच्यामध्ये आणला. यानंतर ती मुंबईत आली व आशा चंद्रा ड्रामा स्कूलमधून अभिनयाचा कोर्स केला. त्याकाळी तिला अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले कारण इंडस्ट्रीमध्ये येण्याच्या निर्णयासाठी तिच्या परिवारातून कोणीच पाठिंबा देत नव्हतं.

त्यामुळे आर्थिक अडचणी सोबतच अनेक मानसिक अडचणी सुद्धा तिच्या वाटेला आलेल्या. पण काहीतरी करून दाखविण्याचा निर्धार पक्का असल्यामुळे कंगनाने हार मानली नाही. प्रत्येकाचाच वेळ पालटतो तसेच कंगणाच्या आयुष्यात सुद्धा झाले.
गॅंगस्टर चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेसाठी एका एजंट मार्फत ती दिग्दर्शक अनुराग बासू यांना भेटली. ऑडिशन चांगली होऊन सुद्धा चित्रपटाचे निर्माते महेश भट यांना कंगनाचे वय खूप कमी वाटल्याने तिच्या बदली चित्रांगदा सेनला या भूमिकेसाठी फायनल केले. पण चित्रांगदा च्या वैयक्तिक कारणामुळे ती हा चित्रपट करू शकत नव्हती त्यामुळे पुढे ही संधी कंगनाला मिळाली. कंगनाने या चित्रपटात तिचे संपूर्ण अभिनय कौशल्य पणाला लावले आणि हा चित्रपट यशस्वी करून दाखवला. २००६ मध्ये जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी कंगणा केवळ १९ वर्षांची होती. त्यानंतर कंगनाने परवीन बाबी यांच्या आयुष्यावर आधारित ‘वो लम्हे’ या चित्रपटांमध्ये काम केले.
२०११ मध्ये आलेला ‘तनु वेडस मनु’ हा चित्रपट तिच्या करियरमधील हिट चित्रपट ठरला त्यावेळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ७० करोड रुपयांचे कलेक्शन केले होते. मध्यंतरी तिचे काही चित्रपट फ्लॉप गेले परंतु नंतर क्रिश ३, क्वीन आणि तनु वेडस मनु २ या चित्रपटांनी तिची गाडी पुन्हा रुळावर आणली. क्वीन या चित्रपटात तिने स्वतःच्या अभिनयावर संपूर्ण चित्रपट चालवला आणि या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर अवॉर्ड तसेच नॅशनल अवॉर्ड सुद्धा मिळाला होता. कंगना सर्वात शेवटी ‘मनिकर्णिका’ या चित्रपटात झाशीच्या राणीच्या भूमिकेत दिसली होती.
कंगणाचे असे म्हणणे आहे की करिअरच्या सुरुवातीला ती या इंडस्ट्रीमध्ये नवखी असल्यामुळे इंडस्ट्रीमधील इतर लोकांनी तिला खूप त्रास दिला होता. सुरुवातीला तिला इंग्रजी नीट बोलता येत नसल्यामुळे तिची खिल्ली उडवली जायची. या कारणासाठी अनेकदा तिला काही कामातून रिजेक्ट सुद्धा केले होते. पण या सर्वातून बाहेर पडून ती आता बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !