प्रियंका चोपडा आणि निक जोनास हे बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील क्युट कपल म्हणून ओळखले जातात. या दोघांना एकत्र पाहून त्यांचे फॅन्स नेहमी खुश असतात. नुकतेच प्रियंका चोपडाने तिचे आणि निकचे एक क्युटसे बेडरूम सीक्रेट शेअर केले आहे.
प्रियंका चोपडा ने एका इंटरव्यू मध्ये सांगितले होते की झोपेतून उठल्यावर सर्वात आधी तिचा चेहरा दिसावा अशी निक ची डिमांड असते. प्रियंका चे म्हणणे आहे की त्याची ही डिमांड माझ्यासाठी खूप कठीण असते कारण मी झोपेतून उठल्यावर माझे डोळे खूप सुजलेले असतात. ते नीट दिसावे यासाठी ती थोडे क्रीम आणि मस्करा लावू इच्छिते मात्र निक तिला यातले काहीच करू देत नाही. त्याला उठल्यावर सर्वप्रथम प्रियांकाला पाहायचे असते. पण प्रियांकाला मात्र निकची ही सवय खूप क्युट वाटते.
प्रियंका आणि निकच्या पहिल्या इंटरव्यू बद्दल आम्ही आज तुम्हाला थोडक्यात सांगणार आहोत जेथे त्यांनी त्यांची लव स्टोरी सांगितली होती. सर्वप्रथम प्रियांका आणि निक २०१७ च्या मेट गाला अवॉर्ड्समध्ये एकत्र दिसले होते. तेव्हाच हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. मात्र खरेतर प्रियंका आणि निक ने एकमेकांना २०१६ पासून डेट करणे सुरू केले. प्रियांका ने सांगितले की त्यावेळी निकने त्याच्या एका मित्राला मेसेज करून सांगितले होते की प्रियांका क्वांटीको मध्ये खूप जबरदस्त काम करते. त्याचा तो मित्र प्रियंका सोबत क्वांटीकोमध्येच काम करायचा.
त्यानंतर ८ सप्टेंबर २०१६ ला निकने प्रियंकाला ट्विटर वर मेसेज केला होता त्यात त्याने प्रियंकाला सांगितले की आपण दोघांनी भेटले पाहिजे असे मला माझे मित्र सांगत आहेत. त्यावर प्रियांकाने निकला रिप्लाय देत म्हटले की तू पाठवलेला हा मेसेज माझी संपूर्ण टीम वाचू शकते. तू मला वैयक्तिक मेसेज का करत नाहीस. यानंतर दोघांचे मेसेजवर बोलणे चालू झाले.
प्रियांकाने सांगितले की, ज्यावेळी आम्ही पहिल्यांदा डेटवर गेलो होतो त्यावेळीही निक मला बोलला की तुझा जगाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो मला खूप आवडतो. सतत काहीतरी करून दाखवण्याची तुझी इच्छा मला खूप आवडते.
त्याच्या अशा बोलण्यामुळे पहिल्यांदा माझ्या मनात त्याच्याबद्दल भावना निर्माण होऊ लागल्या होत्या. एक मुलगी या नात्याने याआधी माझ्या कोणत्याच बॉयफ्रेंडने मला असे कधीच म्हटले नव्हते की त्याला माझी महत्त्वाकांक्षा आवडते. त्यांच्या पहिल्या डेट नंतर प्रियांका चोपडाने निक जोनसला तिच्या घरी निमंत्रित केले होते. तिच्या घरी तिची आई मधु चोपडा आधी पासूनच उपस्थित होती. निक तिच्या घरी गेल्यावर त्या दोघांनी खूप वेळ गप्पा मारल्या आणि तिची पाठ थोपटली.
त्यांच्या पहिल्या डेट बद्दल निक ने सांगितले की त्यावेळी आमच्यात कोणतीच किस आणि काहीच झाले नाही. मी फक्त तिची पाठ थोपटली होती आणि मला आज देखील याचा खूप पश्चाताप होतो. मी त्यावेळी तिची आई उपस्थित असल्यामुळे तिला किस केले नव्हते. माझ्या मते आमची पहिली भेट ही एक समाजमान्य मुलाखत होती.
अनेकदा अशा बातम्या आल्या होत्या की निकने प्रियांकाला तिच्या वाढदिवशी प्रपोज केले होते. मात्र निकने यावर खुलासा देत सांगितले की त्याने तिचा वाढदिवस संपल्यावर तिला प्रपोज केले होते. निकने सांगितले की त्यादिवशी तो रात्री बारा वाजण्याची वाट पाहत होतात कारण पुढल्यावर्षी प्रियांका चा बर्थडे आणि तिला प्रपोज केल्याची तारीख ही एकच यायला नको होती. कारण पुढच्या वर्षी त्या दोन्ही गोष्टी एकाच दिवशी सेलिब्रेट कराव्या लागल्या असत्या.
प्रपोज करताना निकने गुडघ्यावर बसून प्रियांकाला विचारले की, तु मला या दुनियेतील सर्वात आनंदी माणूस बनवशील का? निक ने सांगितले की मला हे बोलण्यासाठी प्रियंकाने केवळ ४५ सेकंद घेतली होती. मात्र ती ४५ सेकंद एकदम शांत होती. त्यावेळी मी तिला सांगितले की तुझी हरकत नसेल तर मी ही अंगठी तुला घालू इच्छितो.
निक सांगतो आमच्या तिसऱ्या डेट वेळीच मी प्रियंका सोबत लग्न करण्याचा निश्चय घेतला होता. मी हे माझ्या आईला सुद्धा फोन करून सांगितले होते. या आधीही ऑस्कर पार्टी दरम्यान सर्वांसमोर गुडघ्यावर बसून हातात ड्रिंक घेऊन निकने प्रियांकाला विचारले की इतके दिवस या आधी तू कुठे होतीस? मात्र ते मी खूपच फास्ट बोललो होतो.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !