Headlines

उरी फेम अभिनेता ‘विकी कौशल’ने फिल्म फेअर अवॉर्ड वरती केले गंभीर आरोप, स्टारकीड सोडून दुसऱ्यांना …

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने अचानक आ*त्म*ह*त्ये*सारखे मोठे पाऊल उचलल्यामुळे सध्या सोशल मीडियावर लोकांच्या रागाचा पारा चांगलाच चढलेला दिसतो. आज सुशांत सिंह राजपूतच्या नि*ध*ना*ला एक आठवडा पूर्ण झाला मात्र तरीही लोकांमधील राग शांत झालेला दिसत नाही. उरी फेम अभिनेता विकी कौशलने फिल्म फेअर अवॉर्ड वरती आक्षेप घेतला आहे.
नामांकित फिल्मफेअर पुरस्कार दरवर्षी वेगवेगळ्या प्रश्नांनी चर्चेत असतो. फिल्मफेअर पुरस्कार हा भारतातील सर्वात मोठा अवॉर्ड मानला जातो त्यामुळे याबाबत वेगवेगळे प्रश्न नेहमीच उभे राहतात. हा पुरस्कार भारतातील सर्वात जुना पुरस्कार सोहळा आहे मात्र आजच्या काळात लोकांच्या आशेला खरेच योग्यरीत्या उतरतो का ? कदाचित याचे उत्तर सर्वजण जाणतात ! आज बॉलीवूड एका अशा स्थानी आहे जेथे त्याच्यावरून अनेक प्रश्न उठत आहेत आणि या प्रश्नांना कोणालातरी उत्तर द्यावेच लागेल. आम्ही तुम्हाला थोडं भूतकाळात घेऊन जातो.२०१६ मधे फिल्मफेअर बेस्ट डेब्यू मेल ऍक्टर या पुरस्कारासाठी विकी कौशल आणि सूरज पांचोली यांना नामांकन मिळाले होते. सर्वांना विकी कौशल कडून खूप अपेक्षा होत्या की कदाचित हा अवॉर्ड त्याला मिळेल कारण त्याने त्याच्या चित्रपटासाठी खूप मेहनत सुद्धा घेतली होती आणि चित्रपट बॉक्स ऑफिस वर जास्त कमाई करू शकला नाही तरीही लोकांना पसंत सुद्धा पडला होता. पण चित्रपट समिक्षकांनी चित्रपटाचे खूप कौतुक केले होते. त्याच्यासमोर स्पर्धक म्हणून सुरज पंचोली होता त्याने हिरो चित्रपटांमध्ये काम केले होते. हा चित्रपट सलमान खान च्या बॅनरखाली बनला होता.

सलमान खान ला सुरज चा गॉडफादर म्हटले जाते. त्याचा सुद्धा चित्रपट बॉक्स ऑफिसवर साधारण चालला. चित्रपट समीक्षकांनी या चित्रपटाबाबत फारसे चांगले मत व्यक्त केले नाही आणि सुरज ला त्याच्या अभिनयावर मेहनत घेण्याचा सल्ला दिला. २०१६ च्या फिल्मफेअर बेस्ट एक्टर डेब्यू या पुरस्काराची घोषणा झाली आणि कोणाचे नाव घोषित होणार यासाठी सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली. त्यावेळी बेस्ट एक्टर डेब्यू म्हणून सुरज पंचोली चे नाव घेण्यासाठी जाहीर झाले.
त्या वेळी सगळीकडे खुशी चा माहोल होता परंतु त्या दिवशी एका उत्कृष्ट कलाकाराला त्याच्या भविष्यातील लढाईची जाणीव झाली होती. फिल्मफेअर अवॉर्ड पैसे घेऊन दिला जातो असे आरोप अनेकदा फिल्मफेअर वर लागले आहेत. शाहरुख खान ने सुद्धा एकदा त्याच्या एका इंटरव्यू मध्ये सांगितले होते की त्याने पैसे देऊन फिल्मफेअर अवॉर्ड खरेदी केला होता.
आता फिल्मफेअर मध्ये एक ट्रेंड बदलला आहे की तेथे जाऊन जो कोणी नाचतो किंवा परफॉर्मन्स करतो त्यालाच अवॉर्ड दिला जातो. प्रत्येक वर्षी फिल्मफेअर अवॉर्ड अनफेअर होताना दिसत आहे आणि कदाचित या पुढे अजून दिसेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !