पेट्रोलच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचे बजेटचे गणित कोलमडले आहे. खासकरुन ज्या लोकांना ऑफिसला जाण्यासाठी रोज ४० ते ५० किलोमीटरचा प्रवास करावा लागतो त्यांना आता खिशात जास्तीचे १००० ते १२०० रुपये ठेवावे लागतील. कारण सध्या त्यांना दिवसाला १०० रुपयांचे पेट्रोल खर्च करावे लागत आहे. त्यामुळेच लोक सध्या इलेक्ट्रिक स्कुटर किंवा बाइक खरेदी करत आहेत. तर काही लोक इलेक्ट्रिक सायकल सुद्धा खरेदी करत आहेत.
इलेक्ट्रिक सायकल खरेदी करण्याचे अनेक फायदे आहेत. त्यातला पहिला फायदा म्हणजे मेंटेनन्स खुप कमी असतो. मेंटेनन्सच्या नावाखाली केवळ टायर पंक्चरच होतो. त्याचा खर्च खुप कमी असतो. १ किंवा २ युनिटमधुन या इलेक्ट्रिक सायकलची बॅट्री पुर्ण चार्ज होते. त्यानंतर त्याला ३० किलोमीटर चालवता येते. १ युनिट वीजेची किंमत ७ रुपये आहे. याचाच अर्थ १४ रुपयांमध्ये सायकल ३० किलोमीटर चालेल.
एवढेच नाही ही सायकल पॅंडल आणि इलेक्ट्रिक मोड अशा दोन्ही पद्धतीने चालवता येते. तेव्हा या सायकलवरुन ४० किलोमीटर पेक्षा जास्त प्रवास करता येतो. आज आम्ही तुम्हाला ५ अशा सायकल बद्दल सांगणार आहोत ज्या रोजच्या वापरासाठी खुप फायदेशीर आहेत. यामध्ये खर्च तर कमी होतोच शिवाय तुमची तब्येतसुद्धा सुरक्षित राहते.
1. Unisex Exalta Electric Cycles – ही सायकल अॅमेझॉनवरुन २०,९९९ रुपयांना खरेदी करता येते. मॉडेल आणि मॉडिफिकेशनवरुन या सायकलची किंमत बदलत जाते. या सायकलला रिम्हुवेबल रिचार्जेबल बॅटरी दिली आहे. ही सायकल ४ ते ५ तासात पुर्ण चार्ज होते. या बॅटरीची रेंज २० ते २५ किलोमीटर इतकी आहे. तर पेडल मोड मध्ये ही सायकल ३० ते ३५ किलोमीटरची रेंज देते.
2. Hero Lectro C3i 26 SS – या इलेक्ट्रिक सायकलची किंमत ३२,४९९ रुपये आहे. या सायकलला 36V 5.8Ah लिथियम ऑयन बॅटरी दिलेली आहे. या बॅटरीला IP67 रेटिंग दिलेली आहे. तसेच बॅटरीला २ वर्षांची वॉरंटी दिलेली आहे. या सायकलची बॅटरी चार्ज करायला ४ तासांचा कालावधी लागतो. बॅटरीपासन या सायकलची रेंज २० ते २५ किलोमीटर आहे तर पॅडलवरुन ३० ते ३५ किलोमीटर आहे.
3. TRIAD E5 Electric Bicycle – ही इलेक्ट्रिक सायकल अॅमेझोनवर ३७,११५ रुपयांना खरेदी करता येते. या सायकलला रिम्हुवेबल रिचार्जेबल बॅटरी दिली आहे. ही सायकल ३ ते ४ तासात पुर्ण चार्ज होते. या बॅटरीची रेंज ३० किलोमीटर इतकी आहे. तर पेडल मोडवर ही सायकल ५० किलोमीटरची रेंज देते.
4. Hero Lectro Renew 26T – या इलेक्ट्रिकल सायकलची किंमत ४६००० रुपये आहे. या सायकल ला 48V 11.6Ah लिथियम ऑयन बॅटरी दिली आहे. या बॅटरीला IP67 रेटिंग दिली आहे. तसेच या बॅटरीला २ वर्षांची वॉरेंटी आहे. या बॅटरीला चार्ज व्हायला ४ ते ५ तासांचा कालावधी लागतो. तर पॅडल मोडवर ४० ते ५० किलोमीटरची रेंज देते. रायडिंग करताना कम्फर्टेबल वाटावे यासाठी या सायकल ला मोठे टायर्स दिले आहेत.
5. Nexzu Rompus+ – नेक्सजू मोबिलिटीच्या रोमपस प्लस इलेक्ट्रिक साइकलची कीमत 31,980 रुपये आहे. यात 36V, 250 WUB HUB ब्रशलेस डीसी (BLDC) मोटर दिली आहे. यात 36V, 5.2 Ah लिथियम आयन बॅटरी आहे. जी या सायकलला ७५० बॅटरी लाइफ देते. याची बॅटरी २.५ ते ३ तासात फुल चार्ज होते. ही सायकल ३५ किलोमीटरपर्यंत चालते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !