Headlines

गरिबांसाठी आता घरगुती गॅस सिलेंडर मिळेल ३१२ रुपयांनी स्वस्त पण त्यासाठी तुम्हाला करावे लागेल हे एक छोटंसं काम !

LPG ची किंमत भलेही सात वर्षात दुप्पट झाली असली तरीही स्वयंपाक घरातील गॅसचा वापर कमी होण्याऐवजी जास्त वाढला आहे. तुम्ही सुद्धा LPG गॅस वापरणाऱ्या पैकी एक असाल तुमच्यासाठी एक खास गोष्ट आहे. सरकार स्वयंपाक घरात वापरात येणार्‍या घ्यायसाठी सबसिडी देते. ही सबसिडी डायरेक्ट यांच्या खात्यात जमा केली जाते.

पेट्रोल डिझेलच्या सततच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसमान्य जनता खुप त्रस्त झाली आहे. परंतु त्यापेक्षाही जास्त त्रास हा घरगुती गॅस सिलेंडल महागल्यामुळे झाला आहे. गेल्या काही महिन्यातच या गॅसची किंमत तब्बल २०० रुपयांनी वाढली आहे. ज्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या खाण्यापिण्याचे वांदे झाले आहेत. पण जर तुम्हाला हा सिलेंडर ३०० रुपयांनी कमी किंमतीत मिळाला तर……. कोणाला नाही आवडणार.. चला तर जाणुया काय आहे या मागची प्रोसेस !

प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या अंतर्गत गॅस सिलेंडरवर सब्सिडी मिळवण्यासाठी आधारकार्ड या योजनेशी लिंक असणे गरजेचे आहे. जर असे नसेल तर तुमच्या खात्यात सबसिडीचे पैसे जमा होणार नाही. सरकार घरगुती गॅस सिलेंडरवर सबसिडी देते. प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत सबसिडी १७४.८० रुपयांपासुन ३१२.८० रुपयांनी वाढली आहे. जर तुम्ही या योजनेत रजिस्टर असाल तर तुमचीपण ३१२ रुपयांची बचत होऊ शकते. उज्ज्वला योजनेतील 2011 च्या जनगणनेनुसार बीपीएल (गरीब) गटात मोडणाऱ्या कुटुंबांना उज्ज्वला योजनेचा लाभ मिळू शकेल.

आधारकार्ड असणे गरजेचे आहे – प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या अंतर्गत गॅस सिलेंडरवर सबसिडी मिळवण्यासाठी आधारकार्ड या योजनेसोबत लिंक असावे. जर तसे नसेल तर तुमच्या खात्यात सबसिडी जमा होणार नाही. आधार कार्डवरुन LPG सब्सिडी मिळवण्यासाठी आधारकार्ड तुमच्या बॅंक अकाउंटला लिंक करावे लागेल. तसेच तुमचा मोबाईल नंबरसुद्धा गॅस एजेंसीसोबत रजिस्टर असायला हवा. आधारकार्ड लिंक नसेल किंवा मोबाइल क्रमांक रजिस्टर नसेल तर ही सुविधा तुम्हाला मिळणार नाही.

असे करा रजिस्टर – तुमच्या आधारकार्डला तीन प्रकारे रजिस्टर करता येते. पहिले म्हणजे मोबाइल क्रमांकाद्वारे, दुसरे म्हणजे मोबाइल क्रमांका द्वारे, आणि तिसरे म्हणजे UID <Aadhar number> टाइप करुन गॅस एजन्सीच्या नंबरवर पाठवुन रजिस्टर करता येतो. रजिस्टर झाल्या झाल्या तुमच्या मोबाइलवर माहिती येते.

या नंबरवर फोन करावा – तुम्ही तुमच्या मोबाइल नंबरवरुन एसएमएसद्वारे जर रजिस्टर करु शकत नसाल तर तुम्ही इंडेन गैस एजेंसीचा टोल फ्री नबंर 1800 2333 5555 वर कॉल करा. हे काम कस्टमर केअर अधिकारी करुन देतात.

UIDAI च्या वेबसाइटवरुन – जर तुम्ही आधारकार्डला ऑनलाइन गॅस सबसिडीसाठी लिंक करु इच्छित असाल तर तुम्ही UIDAIच्या वेबसाइटवर ते करु शकता. यासाठी वेबसाइटवर तुमचे नाव, पत्ता, स्किम, गॅस ड्रिस्ट्रीब्यूटरची माहिती या सर्व गोष्टी भरुन वेबसाइटद्वारे तुमचे आधार कार्ड सबसिडी मिळवण्यासाठी लिंक करु शकता.

IVRS द्वारे – Indane ची अधिकृत वेबसाईट https://cx.indianoil.in/webcenter/portal/LPG/pages_bookyourcylinder वर जा. तेथे तुम्हाला IVRS ( Interactive Voice Response system) हा पर्याय दिसले. त्यावर क्लिक करा. तेथे तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स मिळतील. तेथे तुम्हाला ७७१८९५५५५५ हा कॉमन नंबर दिसेल. IVRS नंबर वर कॉल केल्यावर तुम्हाला आधार कार्ड ची माहिती भरावी लागेल. त्यानंतर तुमचे आधार कार्ड गॅस कनेक्शनशी लिंग होईल.

टीप – उज्ज्वला योजनेतील 2011 च्या जनगणनेनुसार बीपीएल (गरीब) गटात मोडणाऱ्या कुटुंबांनाच फक्त या उज्ज्वला योजनेचा लाभ मिळू शकेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !