अनेकांनी त्यांच्या बालपणी आई हे टीशर्ट खुप मोठ आहे. असं म्हटलं असेल. त्यावर आईने सुद्धा तुम्हाला म्हटलं असे की काही नाही आता घाल असाच अजुन दोन तीन वर्षांनी तो बरोबर होईल तुला. तुम्ही जर मिडल क्लास फॅमिलीमध्ये जन्मला असाल तर तुम्ही सुद्धा अशी आणि अशा प्रकारची अनेक वाक्ये ऐकली असतील.
मिडल क्लास फॅमिलीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना जर एखादी गोष्ट मिळवायची असेल तर काही वेळेस त्यांना त्यांच्या इच्छेला मारावे लागते. किंवा त्यांच्या त्या इच्छा पुर्ण करण्यासाठी त्यांच्या आई वडिलांना संघर्ष करताना पाहावे लागते. प्रेम आणि ओरडा यांसारख्या समिश्र वातावरणात मिड क्लास कुटुंबातली मुल वाढतात.
ही मुले टुथपेस्ट अगदी पिळुन बाहेर काढण्यापासुन ते अगदी मोठे कपडे घालण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतात. त्यांना या सर्व गोष्टींची सवय झालेली असते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहोत ज्या मिडल क्लास फॅमिलीमध्ये सर्रास घडतात.
१. घरात जर साबण संपला तर जुन्या उरलेल्या साबणाला दुसरा साबण चिटकवला जातो. मग आपण म्हणायचो कि अरे वाह साबण मोठा झाला. २. लहानपणी जेव्हा आपले आईवडिल आपल्यासाठी कपडे खरेदी करायला घेऊन जायचे तेव्हा जर आपण १० वर्षांचे असु तर ते आपल्याला १३ वर्षांच्या मुलाचे कपडे घ्यायचे. जेव्हा आपण ते कपडे मोठे आहेत असे आईला सांगायचो तेव्हा आई आपल्याला आता दोन तीन वर्ष नवीन कपड्यांची गरज नाही असं म्हणायची.
३. आपल्या घरी जेव्हा एखादे फंक्शन असायचे तेव्हा जे गिफ्ट यायचे ते तसेच ठेवले जायचे. यामागचे कारण विचारल्यावर सा्ंगितले जायचे कि दुसऱ्या कोणाच्या तरी फंक्शनला देण्यास उपयोगी येतील. आणि नंतर ते गिफ्टस् हळु हळु दुसऱ्यांना देऊन संपुन जायचे.
४. मिडल क्लास फॅमिलीमध्ये शांम्पुच्या बॉटल ऐवजी पाउच जास्त वापरले जातात. मात्र जर चुकुन महिन्याच्या सामानामध्ये ती बॉटल भरलीच तर ती बॉटल संपल्यावर त्या बॉटलमध्ये पाणी टाकुन उरलेला शांम्पु वापरला जायचा. म्हणजेच त्या शाम्पुची सर्व किंमत वसुल केली जायची.
५. लहानपणी घरी कोणी पाहुणे आल्यावर जातेवेळी ते आपल्याला पैसे देऊन जायचे. पण ते पाहुणे गेल्यावर आपला त्या पैशांवरचा हक्क संपायचा. ते पैसे आपल्याला लगेच आई किंवा आजीला द्यावे लागायचे. ६. मिडल क्लास फॅमिलीमधले लोक आजदेखील कोणत्याही हॉटेल मधुन चेक आऊट करताना तेथील शाम्पु आणि साबण घेऊन जातात.
७. घरातली टुथपेस्ट संपली आहे असे आईला सांगितल्यावर आई आपल्याला म्हणायची की जरा नीट पिळुन घे आजच्या पुरती मिळेल तुला. ८. घरात कोणतीही नवीन काचेच्या वस्तु आणल्या तर त्या कोणी पाहुणा येईपर्यंत वापरल्या जायच्या नाहीत.
९. कोल्ड ड्रिंक्स ची कोणतीही मोठी बॉटल आणलीकी ती संपल्यावर त्यात पाणी भरुन ठेवण्यासाठी वापरली जाते. १०. टिव्हीचा रिमोट पोलिथिनमध्ये लपेटुन ठेवण्याची जबाबदारी घरातील लहानमुलांवर असायची.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !