Headlines

आज शनी अमावस्या, करा हे १० उपाय शनीदेव होतील खुश आणि करतील सर्व मनोकामना पूर्ण !

शनिवारी येणाऱ्या अमावास्येला शनि अमावस्या असे म्हणतात. या वर्षी शनी अमावस्या १३ मार्च ला म्हणजेच आज आहे. धार्मिक दृष्ट्या या शनी अमावस्येचे महत्व खूप जास्त आहे. या दिवशी शनिदेवाची पूजा अर्चा करून त्यांची कृपादृष्टी मिळवली जाते. ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारच्या दिवशी शनि देवाची शांती केल्यास चांगले फळ प्राप्त होते. यासाठी तुम्हाला आम्ही काही सोपे उपाय सांगणार आहोत.

. लोखंडाच्या भांड्यात राईच्या तेल घेऊन त्यात स्वतःचा चेहरा पहा. त्यानंतर ते तेल गरजू व्यक्तींना दान करा. ज्यांच्या आयुष्यात शनीची साडेसाती चालू आहे. अशा व्यक्तींनी या दिवशी मांस किंवा मदिराचे सेवन करू नये.

२. शनि अमावास्येला श्रद्धापुर्ण भावाने पिंपळाच्या झाडाला स्पर्श करुन १०८ वेळा ‘ॐ नमः शिवाय म्हणावे. जो व्यक्ती शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला स्पर्श करतो त्याला शनिदेव कधीच सतावत नाही असे ब्रम्ह पुराणात सांगितले आहे.

३. शनि अमावास्येला काळ्या कपड्यात कापुर लपेटुन शनिदेवाची आरती करावी. त्यानंतर ती आरती घरातील सर्व खोल्यामध्ये फिरवावी. त्यामुळे घरातील सर्व नकारात्नक शक्ती नष्ट होतील. ४. शनि अमावास्येच्या दिवशी शनि महाराजांना काळे तिळ अर्पण करावे. किंवा काळे तीळ दानसुद्धा करु शकतात. यामुळे शनिदेवाची कृपादृष्टी सदैव तुमच्यावर राहिल. तसेच तुमच्यावर जर शनिदेवाचा वाईट प्रभाव असेल तर त्याचा तुमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही.

५. शनि अमावास्येला भगवान शंकराची सुद्धा आराधना करावी. तसेच या दिवशी शंकराचे पंचाक्षरी मंत्र पठण करावे. यामुळे शनिदेवाचा प्रकोप कमी होतो. ६. शनि अमावास्येला शनि देवाला निळ्या रंगाचे फुल चढवावे. तसेच काळ्यारंगाची वात असलेला दिवा तीळाच्या तेलात लावावा.

७. शनि अमावास्येला शनि देवाची पुजा करते वेळी ॐ प्रां प्रीं प्रौं स: शनिश्चराय नम: हा मंत्र तीन माळा जपावा. हा उपाय केल्यास शनिदोष दुर होण्यास मदत होते. ८. शनि अमावास्येला शमिच्या झाडाचे वृक्षारोपण करावे. व त्या झाडाची नित्यनियमाने पुजा करावी, यामुळे तुमच्या घराचा वास्तुदोष दूर होईल तसेच शनिदेवाची कृपादृष्टीसुद्धा बनुन राहिल.

९. शनि अमावास्येला सुर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाखाली बसुन शनिदेवाचे ध्यान करावे. त्यानंतर राईचे तेल घालुन दिप ज्वलन करावे. १०. शनि अमावास्येला हनुमानाची पुजा करावी. हा उपाय केल्यास शनिपिडा दूर होते.तसेच या दिवशी सुंदरकांडा पठणसुद्धा करावी.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

टीप – पुराणांविषयी दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून पुराणांच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्यालयाला जुन्या पुराणांविषयी माहिती पाहिजे असेल तर तज्ज्ञ मंडळींना भेटावे. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.