वि*ध*वा पत्नीचा पुनर्विवाह झाल्यानंतरही मृत पतीच्या संपत्तीवर अधिकार असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायलायाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. एका खटल्याची सुनावणी करताना नागपूर खंडपीठाने हा निकाल सुनावला आहे.
पूर्ण प्रकरण – सुनंदाचा पती अनिल हा रेल्वेत पॉईंटसमन म्हणून कार्यरत होता. १९ एप्रिल १९९१ ला त्याचे निधन झाले. त्याच्या मृत्यूनंतर महिनाभरातच सुनंदाने पुनर्विवाह केला. दरम्यान, अनिलने नोकरीवर असतानाच सर्व लाभासाठी आपल्या पत्नीच्या नावाची नोंदणी केली होती. त्यामुळे अनिलच्या पत्नीने रेल्वेत नोकरी मिळवण्यासाठी अर्ज केला. तसेच पतीच्या मृत्यूनंतर रेल्वेने ६५ हजार रुपये सुनंदाच्या बँक खात्यात जमा केले. त्यामुळे अनिलच्या आईने दिवाणी न्यायालयात रेल्वेच्या निर्णयाविरुद्ध अर्ज करून सुनंदाने पुनर्विवाह केला असून तिला अपात्र ठरवण्याची विनंती केली. दिवाणी न्यायालयानेही पत्नीला अपात्र ठरवून आईच्या बाजूने निकाल दिला.
त्यामुळे पत्नी सुनंदाने जिल्हा न्यायालयात अपील दाखल केली. अपिलावर जिल्हा न्यायालयाने लाभाची रक्कम आई व पत्नीच्या खात्यात बरोबर जमा करण्याचे आदेश दिले. त्याविरुद्ध अनिलच्या आईने उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवर सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने हिंदू वारसा कायद्याच्या कलम १० अंतर्गत विधवा पत्नी आणि आई दोन्ही पतीच्या निधनानंतर प्रथम वारसदारांमध्ये येतात.
आईचा देखील त्यांच्या मृत मुलाच्या संपत्तीवर समान अधिकार आहे. पत्नीने रेल्वेकडून मिळालेल्या रक्कमेची अर्धी रक्कम रेल्वेला परत करावी आणि रेल्वेने ती रक्कम अनिलच्या आईला द्यावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
दरम्यान, हा निकाल योग्य नसल्याचे बोलले जात आहे. पत्नीने दुसरा विवाह केला तर तिचा मृत पतीच्या संपत्तीवर काहीच अधिकार नसतो, संपूर्ण अधिकार हा आई वडीलांचाच असतो असे मत सामान्य नागरिकांनकडून व्यक्त केले जात आहे.
28 जुलै 2021 ला छत्तीसगढ़ उच्च न्यायालयाने विधवा पत्नीने दुसरे लग्न केले तर तिचा मृत पतीच्या संपत्ती मधील संपूर्ण अधिकार संपून जातो असा निकाल एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान दिला होतो. न्यायमूर्ती संजय के अग्रवाल यांच्या एकल खंडपीठाने या निकाल लावला होता.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !