Headlines

समंथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य या नवरा-बायकोच्या नात्यात फूट ? जाणून घ्या नक्की काय झालंय !

साऊथकडील सुप्रसिद्ध अभिनेता नागार्जुन यांची सुन आणि प्रसिद्ध अभिनेत्री सामंथा अक्किनेनीचा अभिनय द फॅमिली मॅन २ मध्ये पाहण्यास मिळाला. मनोज बाजपेयीच्या या सिरीजमध्ये तिचा परफॉर्मंन्स खुपच दमदार होता. या सिरीजमुळे मध्यंतरी ती खुप चर्चेत होती. या सिरीजसाठी इंडियन फिल्म फेस्टिवल आॅफ मेलबर्न अवार्ड्स 2021 मध्ये तिला बेस्ट एक्ट्रेसचा अवॉर्ड मिळाला. पण चित्रपट आणि प्रोफेशलन आयुष्यासोबत ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातसुद्धा चर्चेत असते.

सध्या सामंथाचे लग्न मोडल्याच्या चर्चा होत आहेत. काही मीडिया रिपोर्टस् मध्ये असे सांगितले जात आहे कि सामंथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य यांच्या वैवाहिक आयुष्यात सध्या अडथळे आल्याचें म्हटले जाते. सामंथाने २०१७ मध्ये नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्यसोबत लग्न केले. गेले काही दिवस ते एकत्र राहत नसल्याचे देखील म्हटले जाते. आता पर्यंत त्यांनी त्यांच्या या नात्यासंदर्भात कुठेच कसली वाच्यता केली नव्हती.

आता सामंथा अक्किनेनी तिच्या व नागा चैतन्यच्या वैवाहिक आयुष्यात आलेल्या अडथळ्यांच्या बातम्यांबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. तिच्या चित्रपटांच्या प्रमोशनवेळी जेव्हा तिला या संदर्भात प्रश्न विचारले गेले तेव्हा ती म्हणाली कि अशाप्रकारच्या फालतु बातम्यांवर जास्त न बोललेले बरे. प्रत्येक व्यक्तीला त्यांचे मत मांडण्याचा पुर्ण अधिकार आहे.

चैतन्यसोबत लग्न करण्यापुर्वी सामंथाचे रंग दे बंसती मधल्या सिद्धार्थवर प्रेम होते. त्याच्यासोबत तर तिला लग्न सुद्धा करायचे होते. मात्र त्यांचा ब्रेकअप झाला आणि मग सर्वच संपले. असे म्हटले जाते कि सिद्धार्थला घेऊन सामंथा खुप सिरीयस होती. पण त्यांच्या ब्रेकअप नंतर अवघ्या काही दिवसांतच सामंथाने चैतन्यसोबत लग्न केले. या दोघांचे खुप धुमधडाक्यात लग्न लावुन दिले होते.

एकदा एका मुलाखतीत सामंथाने सिद्धार्थबद्दल मनमोकळे पणाने सांगितले होते. तिने सांगितले कि मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात खुप अडचणींचा सामना केला आहे. माझ्या नात्याच्या सुरुवातीलाच मला खुप गोष्टी समजल्याने मी पुढे जाऊ शकली. त्यावेळी मला पुढे काहीतरी वाईट होऊ शकते अशी चाहुल लागली होती. आता मी खरचं देवाचे आभार मानते कि मला चैतन्यसारखा साथीदार मिळाला.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !