Headlines

पोस्ट ऑफिस मध्ये महिन्याला गुंतवा १०० रुपये आणि मिळवा १६ लाख रुपये, जाणून घ्या योजना !

सध्या कुठेही गेले तरी पैसा ही महत्वाची गोष्ट झाली आहे. घरची दैनंदिन काम असो, शिक्षण असो किंवा भविष्यातील तरतूद असो. पैसा हा लागतोच. अशातच सध्या कोरोनानंतर सर्व परिस्थिती बदलल्यामुळे अनेक ठिकाणी महागाईने तोंड वर काढले आहे. त्यामुळे पैशांची गुंतवणूक करुन ठेवणे आवश्यक झाले आहे. पण काहीवेळेस गुंतवलेले पैसे सुरक्षित राहतातच असे नाही. अनेकदा त्यांना फसवेगिरीला समारे जावे लागते. मात्र पोस्टाच्या योजनांवर तुम्ही निश्चित विश्वास ठेवू शकता.

पोस्ट ऑफिसची रेकरिंग डिपॉजिट स्कीम ही एक छोटी बचत योजना आहे, यामध्ये तुम्ही गुंतवलेली रक्कम पूर्णपणे सुरक्षित असते. तुम्ही तुमच्या सोयीनुसार एक वर्ष, दोन वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी या योजनेत गुंतवणूक करू शकता. केंद्र सरकार दर तिमाहीत आपल्या बचत योजनेचे व्याजदर निश्चित करते, ज्यातून गुंतवणूकदारांना फायदा मिळतो.

जर तुम्हाला तुमच्या बचतीवर जास्तीत जास्त नफा मिळवायचा असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणूक करून भरपूर नफा मिळवू शकता. यासाठी तुम्हाला तुमची बचत क्षमता वाढवावी लागेल. म्युच्युअल फंडाच्या जमान्यात पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीम चांगला परतावा देत आहे. या स्किमचा अनेकजण लाभ घेत आहेत.

पोस्ट ऑफिस आपल्या नियमित ग्राहकांसाठी विविध योजना राबवत असते. यापैकी रिकरिंग डिपॉझिट स्कीम ही देखील आहे. यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही मोठी कमाई करू शकता. अनेकदा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे धोकादायक असल्याचे दिसून येते. मात्र पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजनेत गुंतवणूक करणे पूर्णपणे सुरक्षित आहे. यामध्ये तुम्ही फक्त 100 रुपयांची गुंतवणूक सुरू करून मोठी रक्कम कमवू शकता.

पोस्ट ऑफिसची ही स्किम म्हणजे एक लहान बचत योजना आहे. ज्यामध्ये तुमच्या गुंतवणुकीची रक्कम सुरक्षित असते. तुम्ही तुमच्या सोयीनुसार एक वर्ष, दोन वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी या स्किममध्ये गुंतवणूक करू शकता. यात गुंतवणुकीच्या रकमेवर दर दर तीन महिन्यांनी कंपाउंड इंटरेस्टसोबत व्याज मिळते. अशा प्रकारे, दर तीन महिन्यांच्या शेवटी, कंपाउंड इंटरेस्टसह व्याजाची रक्कम तुमच्या खात्यात जमा होते.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेवर सध्या ५.८ टक्के दराने व्याज मिळत आहे. हा व्याजदर 1 एप्रिल 2020 पासून लागू झाला आहे. केंद्र सरकार दर तीन महिन्यांनी आपल्या बचत योजनांचे व्याजदर ठरवते/निश्चित करते. पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन कोणतीही व्यक्ती या स्किममध्ये खाते उघडू शकते. तुम्ही या महत्त्वाच्या योजनेत दीर्घ काळासाठी गुंतवणूक केल्यास, तुम्ही स्वतःसाठी मोठी रक्कम मिळवू शकता.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये, 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती आपले खाते उघडू शकते. कोणतेही पालक आपल्या अल्पवयीन मुलासाठी खाते उघडू शकतात. विशेष म्हणजे या पोस्ट ऑफिस स्कीममध्ये तुम्हाला कर्ज घेण्याची सुविधाही मिळते. त्यामुळे जर तुम्ही या योजनेत 12 हप्ते जमा केले तर तुम्हाला बँकांकडून कर्ज मिळू शकते. या स्किममध्ये खात्यात जमा केलेल्या एकूण रकमेपैकी 50% कर्ज म्हणून मिळू शकते.

जर तुम्ही पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीममध्ये दरमहा 10,000 रुपये जमा करून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली, तर 10 वर्षांनंतर तुम्हाला 16 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळेल. म्हणजेच जर तुम्ही दरमहा 10,000 रुपये जमा केले तर एका वर्षात तुमचे 1 लाख 20 हजार रुपये जमा होतील.

तुम्हाला या योजनेत 10 वर्षे सतत गुंतवणूक करावी लागेल. अशा प्रकारे तुम्ही 12,00,000 रुपये गुंतवणूक म्हणून जमा कराल. यानंतर, या योजनेच्या मुदतपूर्तीनंतर, तुम्हाला परताव्याच्या स्वरूपात व्याज म्हणून 4,26,476 रुपये मिळतील आणि मूळ रक्कम देखील जोडली जाईल. या प्रकरणात, तुम्हाला 10 वर्षांनंतर एकूण 16,26,476 रुपये मिळतील. अशा प्रकारे तुम्ही गुंतवणूक करून लाखो रुपये जमा करू शकता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !