अभिनेत्री काजोल गेली 3 दशके बॉलिवूडवर अधिराज्य गाजवत आहे. चित्रपटातील तिचे सौंदर्य, अवखळपणा, अभिनय नेहमीच प्रेक्षकांना भुरळ घालतो. काजोलला इंडस्ट्रीत काम करुन इतकी वर्षे झाली तरीही तिची प्रेक्षकांवरील मोहिनी अजूनही कमी झालेली नाही.
काजोलला पाहता तिच्या वयाचा अंदाज बांधता येत नाही. पण खरेतर काजोल आता 48 वर्षांची झाली आहे. वयाच्या या टप्प्यातही ती खूपच सुंदर आहे. ती आपले वय, फिटनेस या सर्व गोष्टींकडे बारकाईने लक्ष देते.
आजदेखील ती आपली फॅशन, ड्रेसिंग स्टाइल, या सर्व गोष्टींनी सर्वांची बोलती बंद करते. काजोलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.
या व्हिडिओत काजोल आपली आई आणि मुलासोबत जिममधून बाहेर पडल्यानंतर खरेदी करताना दिसत आहे. त्यावेळेस काजोलने निळे शर्ट आणि पिवळ्या रंगाची पॅण्ट घातली होती. त्या कपड्यांमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. त्या कपड्यामध्ये काजोलचा वयाचा जराही अंदाज बांधता येत नव्हता. काही जण तर तिला ट्रोलही करु लागले. पण काजोलने या गोष्टीकडे फारसे लक्ष दिले नाही.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ फिल्मी फेम या युट्युब चॅनलने अपलोड केला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 205 लाखांहुन अधिक लोकांना पाहिले आहे. तर 2 हजारांहून अधिक लोकांनी तो लाइक केला आहे. कमेंट सेक्शनमध्ये काहीजण तिला ट्रोल करत असले तरी बहतेक लोक तिचे कौतुकच करत आहेत.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !