Headlines

या धक्कादायक कारणामुळे एका युवकाने एकाच मांडवात केले दोन बहिणींनीशी लग्न !

दोन जुळ्या बहिणी असल्या कि सगळीकडे एकत्र राहणं, एकत्र फिरणं या सर्व गोष्टी आल्याचं. पण एक अनोखा असा प्रकार अकलुजमध्ये घडलेला पाहायला मिळाला. दोन जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी लग्न केले. या लग्नाला त्यांच्या कुटुंबियांनीदेखील मान्यता दिली.

कांदिवली येथील या मुली दोघी आयटी इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत. रिंकी आणि पिंकी अशी दोघींची नावे असून त्यांनी अंधेरी येथील रहिवासी अतुल या एकाच तरुणाशी दोघींनी विवाह केल्याची घटना समोर आली आहे.

पिंकी आणि रिंकी दोघी जुळ्या असल्याने दिसायलाही एकसारख्याच आहेत. लहानपणापासून एकत्रच राहिल्याने आपण लग्न करून एकाच घरी जायचे, हे दोघींनीही आधीच ठरवले होते.

त्यामुळे आपण एकाच तरुणाशी लग्न करायचे, आणि आयुष्यभर एकत्र राहायचे, या विचारांवर दोघीही ठाम होत्या. अखेर त्यांच्या कुटुंबाने या विवाहास मान्यता दिली आणि काल अकलूज वेळापूर रोडवरील गलांडे हॉटेल येथे हा अनोखा विवाह संपन्न झाला .

मुलगा अतुल हा माळशिरस तालुक्यातील असून मुंबईत त्याचा ट्रॅव्हलसचा विषय आहे. काही दिवसांपूर्वी अतुलचा रिंकी-पिंकीच्या कुटुंबियांसोबत संबंध आला. काही दिवसांपूर्वी रिंकी-पिंकीच्या वडिलांचे निधन झाले आणि त्यांच्या आईसोयाबीत त्या दोघी राहत होत्या.

एक दिवस या तिघीही आजारी पडल्याने अतुलच्या गाडीतून त्याने त्या तिघींना दवाखान्यात दाखल केले होते. त्यानंतर या मुलींचा अतुलसोबत संपर्क वाढत गेला आणि शेवटी अतुलने या दोघी जुक्या बहिणी रिंकी-पँकींसोबत एकाच मांडवात विवाह केला.

त्यांच्या या विवाह सोहळ्याला त्यांच्या कुटुंबियातील जवळपास ३०० पाहुणे मंडळी उपस्थित होती. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या विवाहाचे फोटो आणि व्हिडीओ सोहळ मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. तर लग्न न झालेली जोडपी आणि इतर नेटकरींच्या विविध चर्चांना सोशल मीडियावर उधाण आले आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !