Headlines

आलीया आणि रणबीर लग्नाआधीच का एकत्र झोपत होते स्वतः आलीयाने केला खळबळजनक खुलासा, पहा !

आलिया भट आणि रणबीर कपूर हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सध्या त्यांच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. हा चित्रपट ९ सप्टेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे, त्यामुळे आलिया-रणबीर टीमसोबत चित्रपटाचे सतत प्रमोशन करत आहेत.

दरम्यान, आलिया भट्टनेही ‘लिव्ह इन रिलेशनशिप’वर प्रतिक्रिया दिली आहे. जेव्हा आलिया भट्टला ‘लिव्ह इन रिलेशनशिप’बद्दल तिचे मत विचारण्यात आले. तेव्हा त्या प्रतिसादात आलियाने याला एक अद्भुत अनुभव म्हटले आहे आणि पुढे ती म्हणाली- ‘तुम्ही राहताना एकमेकांसोबत आरामात राहू शकता आणि खूप आठवणी निर्माण करू शकता.’
आलियाने खुलासा केला की तिला आणि रणबीर कपूरला ‘खरोखर लग्न करायचे होते’ म्हणूनच दोघांनी ‘सोबत राहण्याचा’ निर्णय घेतला होता.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी लग्नाआधी जवळपास चार वर्षे एकमेकांना डेट केले आणि त्यानंतर या वर्षी एप्रिलमध्ये लग्न केले. यानंतर, अलीकडेच अभिनेत्रीने जूनमध्ये तिच्या गर्भधारणेची गोड बातमी देखील चाहत्यांना दिली.
ब्रह्मास्त्रमध्ये एकत्र काम करताना रणबीर आणि आलिया प्रेमात पडले आणि आता हे जोडपे लवकरच आई-वडील होणार आहेत.

आता अलीकडेच एका मुलाखतीत आलियाने लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल बोलले आणि म्हणाली- ‘जर राहता येत असेल तर का नाही? तुम्ही दोघे एकमेकांना समजून घेऊ लागाल. तुम्ही एकेमकांसोबत सहज वावरता, तुम्ही अनेक आठवणी निर्माण करू शकता, त्याही कोणत्याही दबावाशिवाय किंवा ओझ्याशिवाय. आणि लग्न करायचं असेल तर का नाही.

स्वतःबद्दल आणि रणबीरबद्दल बोलताना आलिया म्हणाली- आम्ही खरंच लग्न करणार होतो, म्हणून आम्ही एकत्र राहण्याचा विचार केला. पण यानंतर कोरोना आला, पण प्लॅनिंग थांबलं नाही. आम्ही विचार करत होतो की आम्ही सर्वकाही व्यवस्थित करू, सर्वकाही व्यवस्थित होईल. खरे तर आम्ही तसे नियोजन केले होते.”

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर प्रथमच तीन भागांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या ब्रह्मास्त्रमध्ये एकत्र काम करताना दिसणार आहेत. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या पाच वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. आलिया आणि रणबीरसोबत अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !