एक सुपरस्टार रोज रात्री यायचा आणि माझ्या …. , मल्लीकाने सांगितली कॉम्प्रमाइज बद्दलची कोणालाच माहित नसलेली गोष्ट !

bollyreport
4 Min Read

अभिनेत्री मल्लिका शेरावत म्हटले की डोळ्यांसमोर केवळ बोल्डनेस , हॉ’ट सी’न्स या गोष्टी डोळ्यांसमोर येतात. किंबहूना मीडियामध्ये देखील त्याच गोष्टींची चर्चा होत असते. पण मल्लिकाने आता स्वताबद्दल काही खळबळजनक खुलासे केले आहेत.

एका मीडिया हाऊसशी बोलताना मल्लिकाने सांगितले की,’लोक नेहमी फक्त माझ्या बो’ल्ड इमेजबद्दल बोलतात. मी म’र्ड’र हा चित्रपट केला तेव्हा लोकांनी किती गोंधळ घातला. चुं’ब’न आणि बि’कि’नी सी’न्सबद्दल त्यावेळी लोक खूप बोलले, पण दीपिका पदुकोणने अलीकडे जे काही गेहराइयां चित्रपटात जे काही केले आहे, तेच सर्व मी 15 वर्षांपूर्वी केले होते. परंतु त्या वेळी लोकांची विचारसरणी खूपच लहान होती.

ती पुढे म्हणाली की, इंडस्ट्रीतील अनेक लोकांनी माझा मानसिक छळ केला. लोक फक्त माझ्या शरीराबद्दल आणि ग्लॅमरबद्दल बोलत होते, पण अभिनयाबद्दल त्यांनी कधीच काही म्हटले नाही. बो’ल्ड चित्रपट सोडल्यास मी प्यार के साइड इफेक्ट्स आणि वेलकम सारख्या सूपरहिट चित्रपटात काम केले आहे, पण त्या चित्रपटातील माझ्या अभिनयाबद्दलही कोणी बोलले नाही.

मल्लिकाने पुढे सांगितले की पूर्वी अभिनेत्रीसाठी केवळ दोन प्रकारच्या भूमिका लिहिल्या जायच्या त्यात एक खलभूमिका असायची नाहीतर दुसरी म्हणजे अगदी सती सावित्री प्रमाणे निरागस भूमिका असायची. पण आता इंडस्ट्रीमध्ये सुद्धा बदल झाले असून महिलांना माणूस म्हणून दाखवले जात आहे. त्यात ती सुखी दुखी दाखवली जाते. तिच्याकडूनही चुका होताना दाखवल्या जातात. लोकांकडूनही अशा गोष्टींना पसंती मिळत आहे. सध्याच्या नायिका त्यांच्या शरीराबाबतही खूप कंफर्टेबल झाल्या आहेत.

त्यानंतर मल्लिकाला विचारण्यात आले की, त्यावेळी चित्रपटांमध्ये तुझी सशक्त स्त्रीची प्रतिमा असायची याचा तुला कधी त्रास झाला का.. यावर मल्लिका म्हणाली, अर्थातच मलाही त्रास व्हायचा. माझ्या चा’रि’त्र्या’वर प्रश्न केले जायचे. मल्लिका वाईट चालीची आहे, भारतीय संस्कृती खराब करते आहे, असे म्हटले जायचे.

विशेष म्हणजे हे सर्व बोलणाऱ्या आणि लिहिणाऱ्या या महिलाच होत्या. पण मी नेहमीच महिलांना सर्वाधिक पाठिंबा दिला आहे. मी त्यांना स्वावलंबी होण्यासाठी प्रेरित केले आहे. मी महिलांना नेहमीच सांगितले हे की, जर तुम्हाला आयुष्य तुमच्या मनाप्रमाणे जगायचे असेल तुम्हाला स्वतः पैसे कमवावे लागतील.

मल्लिका भट्ट कॅम्पच्या ‘म’र्ड’र’ या चित्रपटाची आठवण काढत म्हणाली की , ‘भट्ट साहेब मला सांगायचे की जेव्हा आपण पडतो ना तेव्हा आपल्याला पडलेले पाहून पडल्यावर मल्लिका, लोकांना खूप मजा येते. कोणत्याही मोठ्या स्टारच्या मदतीशिवाय हिंदी चित्रपटसृष्टीत हिरोईनचं करिअर बनणं कठीण असल्याचंही मल्लिकाने स्पष्टपणे सांगितले.

ती म्हणते, ‘जोपर्यंत तुम्ही मोठ्या स्टारसोबत तडजोड करत नाही तोपर्यंत ते तुमच्यासोबत काम करत नाहीत आणि हे बॉलीवूडचे सत्य आहे, मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगत आहे. आणि जर हे खरे नाही असे कोणत्याही अभिनेत्रीने म्हटले तर ती खोटे बोलत आहे हे समजून जावे.

त्यामुळे त्यांच्यावर तडजोडीचा दबाव असेल असे प्रसंग येतील. मल्लिका म्हणाली, ‘कोणत्याही बॉलीवूड स्टारसोबत तडजोड करण्याचे व्यक्तिमत्त्व माझे नाही. एकदा मी दुबईत माझ्या कारकिर्दीतील एका मोठ्या चित्रपटाचे शूटिंग करत होते. तेव्हा हॉटेलमध्ये मध्यरात्री एक मोठा स्टार वारंवार माझ्या दारावर ठोठावत होता, पण मी दरवाजा उघडला नाही. हे बॉलीवूड आहे आणि हा खेळ इथे खेळला जातो.


मल्लिका च्या पुढील कामाबद्दल बोलायचे झाले तर मल्लिका लवकरच ‘आरके’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत रजत कपूरही असणार आहे. हा कॉमेडी-ड्रामा 22 जुलैला रिलीज होणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.