Headlines

३६ इंचाची छाती किंवा २४ इंचाची बॅक घेऊन अभिनेत्री ….काजोलचे खळबळजनक वक्तव्य,

अभिनेत्री काजोलने तिच्या करीअरची सुरुवात १९९२ मध्ये बेखुदी या चित्रपटातून केली होती. तिच्या करीअरला सुरुवात होऊन ३० वर्षे उलटून गेली आहेत तरी तिची प्रेक्षकांवरील जादू कमी झालेली नाही. या ३० वर्षांत तिने एकाहून एक दमदार चित्रपटात काम केले.

आता काजोल तिचे डिजिटल पदार्पण करण्यास तयार आहे. लवकरच ती ओटीटी प्लॅटफ़ॉर्मवर सुद्धा पहायला मिळेल. काजोल तिच्या सौंदर्यासोबतच तिच्या अनोख्या अंदाजासाठी आणि अभिनयासाठीसुद्धा ओळखली जाते. लवकरच ती नेटफ्लिक्सच्या लस्ट स्टोरी २ मध्ये दिसण्याची शक्यता आहे.

या सिरीजच्या आधीच्या भागात ४ कथा दाखवण्यात आल्या होत्या. त्यात राधिका आपटेसोबत, भूमी पेडणेकर, नील भूपालम, मनीषा कोईराला, संजय कपूर, जयदीप अहलावत, नेहा धुपिया, विकी कौशल, कियारा अडवाणी आणि आकाश ठोसर अशा अनेक मोठे कलाकारांनी काम केले होते.


त्यावेळी ही सिरीज त्यातील बोल्ड आणि इन्टिमेट सीनसाठी चर्चेत होती. आता या सिरीजचा दुसरा भाग येणार असून त्यात काजोलसुद्धा दिसणार आहे.

काही दिवसांपूर्वी काजोलने तिचे ओटीटी प्लॅटफॉर्मसाठीचे मत व्यक्त केले होते. ती म्हणाली की ओटीटी हे सध्याच्या कलाकारांसाठी खूप उत्तम माध्यम आहे. इथे सगळं काही एक्सप्लोअर करता येते. सध्या सगळ्यांकडेच खूप काम आहे. शिवाय ओटीटी मुळे इंडस्ट्रीला खूप चांगले कलाकारसुद्धा मिळाले आहेत.


या माध्यमामुळे लोकांमधील खऱ्या कौशल्यांना वाव मिळाला आहे. आपल्या आसपास असे अनेक कलाकार असतात ज्यांना त्यांची कला सादर करण्यासाठी प्लॅटफॉर्म हवा असतो. ओटीटी मुळे त्यांना तो मिळाला आहे.

इथे काम करण्यासाठी तुमच्याकडे 24-इंच कंबर आणि 36-इंच छाती किंवा 46-इंच छाती आहे किंवा नाही, या गोष्टीचा काही फरक पडत नाही. कारण इथे आपोआप स्टार बनता येते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !