Headlines

जळगावची २२ वर्षाची तरुणी परदेशी कंपनीचे ९ कोटी पॅकेज सोडून का झाली संन्यासी, जाणून घ्या !

महाराष्ट्रातील जळगाव येथील एक मुलगी वयाच्या २२ व्या वर्षी तिने सर्व भौतिक सुखांचा त्याग केला आहे. तिने सर्व सुखसोयींनी परिपूर्ण जीवन सोडले आहे. दीक्षा बोरा असे या अ’ल्प’व’यी’न संन्यासी तरुणीचे नाव आहे. आता ते संयमश्रीजी महाराज म्हणून ओळखली जाईल.

शिक्षण घेत असताना दीक्षाने २०१३ मध्ये जैन धर्माशी संबंधित एका कार्यक्रमात भाग घेतला, तिथेच दीक्षाने संन्यास स्वीकारण्याचा निर्णय घेतला. मात्र यासाठी घरातील सदस्यांची परवानगी आवश्यक होती. ही परवानगी मिळवण्यासाठी दीक्षाला ८ वर्षे वाट पाहावी लागली. जेव्हा घरातील सदस्यांनाही वाटले की दीक्षाचे मन अध्यात्मात विसावणार आहे. दीक्षाला जबरदस्ती सांसारिक जीवनात ठेवता येईल, पण तसं राहण्याची तिची मुळी इच्छा नाही.

दीक्षा बोरा, ज्यांना आता संयमश्री जी महाराज म्हणून ओळखले जाते, तिने पुण्यातून बीबीए पूर्ण केले. दिक्षा बोरा ही राष्ट्रीय स्तरावरील मॅरेथॉन धावपटू देखील आहे. शिक्षणादरम्यान तिने खेळ, वादविवाद, कला, गायन आणि भाषणात आपली प्रतिभा सिद्ध केली आहे.

दीक्षा बोरा हिला एक भाऊ आणि एक बहीण आहे. ती सुखी आणि संपन्न कुटुंबातील असूनही दीक्षाने संन्यासाचा मार्ग निवडला आहे. दीक्षा बोरा यांना कॅलिफोर्नियातील एका कंपनीने एका वर्षात ९ कोटींचे पॅकेज दिले होते. पण दीक्षाने ती ऑफर धुडकावून लावली आणि संन्यास घेण्याचा मार्ग पत्करला.

आयुष्यात पैसाच सर्वस्व नाही. आपले मन किती शांत आणि आनंदी आहे, हे महत्त्वाचे आहे. आनंद गुरूच्या चरणी मिळतो. असा दिक्षाला विश्वास आहे.

नऊ कोटींच्या पॅकेजबद्दल ऐकून लोक आश्चर्यचकित झाले आहेत, पण दीक्षाला तिच्या निर्णयाचे आश्चर्य वाटत नाही. दीक्षा सांगते की, आपण किती पैसे कमावले हे महत्त्वाचे नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जेवढे पैसे कमावले ते आपल्याला आनंद देऊ शकले आहेत.

आपण आपल्या जीवनात समृद्ध आहोत की नाही, आपण आपल्या जीवनात आनंदी आहोत की नाही हे महत्त्वाचे आहे. ९ कोटींच्या पॅकेजने अहंकार तृप्त होतो, पण पैशाने आनंद विकत घेता येत नाही. पैशाने संसाधने नक्कीच विकत घेता येतात, आनंद विकत घेता येत नाही. दीक्षा बोरा जी आता संयम श्रीजी महाराज म्हणून ओळखली जाते, तिच्या श्रोत्यांसमोर अशाच गोष्टी पुन्हा सांगत असते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !