Headlines

गर्दीचा फायदा घेत एका व्यक्तीने गणपती दर्शनासाठी आलेल्या रश्मिका मंदनाला केला नको त्या ठिकाणी स्पर्श, घटना कॅमेऱ्यात कैद, पहा व्हिडीओ

सध्या सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. त्यामुळे आपले आवडते कलाकारसुद्धा आपल्या व्यस्त कामातून वेळ काढत बाप्पाची सेवे करण्यासाठी किंवा त्याच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जात आहे. जागोजागी गणेश मंडळांनी मोठमोठाल्या बाप्पाच्या मुर्ती बसवल्या आहेत.

मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मुंबईत गणेशोतस्वाचे प्रमुख आकर्षण म्हणजे लालबागचा राजा. या राजाकडे एखादी गोष्ट मनापासून मागितली की पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात लालबागनगरी अगदी तुडुंब भरुन जाते.

या राज्या दर्शनाला अनेक बॉलिवूड सेलिब्रेची हजेरी लावतात. यावेळी साऊथकडच्या कलाकारांना सुद्धा लालबागच्या राजाचे दर्शन घेण्याचा मोह आवरला नाही. पुष्पा फेम अभिनेत्री रश्मिका मंदनासुद्धा लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहचली होती.

रश्मिका मंदान्ना नुकतीच मुंबईत आली होती आणि ती थेट एकता कपूरसोबत लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेली मात्र तिथे तिला विनयभंगाच्या प्रसंगाला सामोरे जावे लागले. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
प्रत्यक्षात ‘लालबागचा’ राजा पाहण्यासाठी पोहोचलेल्या रश्मिकाला प्रचंड गर्दीचा सामना करावा लागला.

कार्यकर्ते आणि पोलिसांच्या मदतीने ती मोठ्या कष्टाने गणपतीपर्यंत पोहोचू शकली. मात्र यादरम्यान एका पोलिसाने तिला चुकीचा स्पर्श केला. यावेळी रश्मिकासोबत बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता आणि निर्माती एकता कपूरही उपस्थित होत्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)


व्हायरल झालेला व्हिडीओत गणपतीच्या मंडपामध्ये हजारोंची गर्दी होती. त्याचवेळी रश्मिकाला पाहताच गर्दी अनियंत्रित होऊ लागली. चाहते ‘श्रीवल्ली’ची एक झलक पाहण्यासाठी आतुर झाले. ती देवाच्या मूर्तीजवळ जात असताना गर्दीतील एका पोलीस कर्मचाऱ्याने तिला चुकीचा स्पर्श केला. हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. गर्दीचा फायदा घेत अभिनेत्रीचा वि’न’य’भं’ग करण्यात आला. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक चाहत्यांनी आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत विशेष स्थान निर्माण करणारी रश्मिका आता हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत महानायक’ अमिताभ बच्चन यांच्यासोबत पदार्पण करणार आहे. नुकताच तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट ‘गुडबाय’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. रश्मिका आणि अमिताभ बच्चन यांच्या या चित्रपटात पावेल गुलाटी, नीन गुप्ता यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट ७ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !