Headlines

रूममध्ये मी सोबत घेऊनच झोपते … इशा गुप्ताने सांगितली बॉलिवूडची खरी काळी बाजू !

ईशा गुप्ता बॉलिवूडधील हॉटेस्ट अभिनेत्रींच्या लिस्टमधले एक नाव. हल्लीच ईशाने तिचा ३७ वा वाढदिवस साजरा केला. ईशा तिच्या हॉटनेसने नेहमीच सोशल मिडीयाचा पारा वाढवत असते. ईशा नेहमीच सोशल मीडियावर भरपूर ऍक्टिव्ह असते.

तिची फॅन फॉलोइंग देखील लाखोमध्ये आहे. आश्रम ३ मध्ये ईशाने काम केले होते या वेबसिरीजमध्ये तिने भरभरून बोल्ड सिन दिले आहेत आणि तिच्या सगळ्या फॅन्सना घायाळ केले आहे. ईशाचे फॅन्स तर तिच्यावर फिदा झाले आहेत. ईशा गुप्ता बॉलिवूडमधल्या सुपरहॉट अभिनेत्रींपैकी एक आहे.

दिल्लीमध्ये १९८५ ला ईशाचा जन्म झाला. २००७ मध्ये ईशा फेमिना मिस इंडियाचा भाग होती. यामध्ये तिला तिसरी रँक मिळाली. यानंतर तिने मिस इंटरनॅशनलमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. आणि मिस इंटरनॅशनलचा किताब तिने जिंकला. २०१२ मध्ये ईशाने जन्नत २ या चित्रपटातून आपल्या बॉलिवूडमधील करिअरला सुरुवात केली. यानंतर तीने बेबी, कमांडो, रुस्तम, टोटल धमाल यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. ईशा गुप्ताने अनेकदा फिल्म इंडस्ट्रीचे खरे रूप उघड केले आहे.

कास्टिंग काऊचची बॉलिवूडमध्ये नेहमीच चर्चा असते. ईशाने जेव्हा तिचा अनुभव सांगितला तेव्हा तिने आतमध्ये काय चालते या सगळ्याची पोल खोलली. कास्टिंग काऊच आणि बॉलिवूडमध्ये मुलींना चुकीची वागणूक दिली जाते. याचबाबत ईशाने तिचा अनुभव शेअर करताना सांगितले, माझ्या सोबत देखील दोन जणांनी असे केले.

त्यातील एका सोबत मी चित्रपटात काम देखील केले आहे. पण मी सुद्धा शहाणी आहे मी माझ्या रूममध्ये एकटी झोपायची नाही, आऊटडोर शूट असताना सुद्धा मी माझ्या मेकअप आर्टिस्टला सोबत माझ्या रूममध्ये राहायला सांगायची. अशी घटना इंडस्ट्रीमध्ये कधी लहान मुलांसोबत होणार नाही कारण असं झालं तर त्या मुलांचे पालक त्यांना सोडणार नाहीत.

इंडस्ट्रीमध्ये बहुदा बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी असा विचार केला जातो. कारण समोरच्याला असे वाटते की, काम मिळवण्यासाठी हे लोक काहीही करायला तयार होतील. तसही यांचं इथे कोणीच नाही. कास्टिंग काऊच बाबत आणखी एक अनुभव सांगताना ईशा म्हणाली मला एक चित्रपट शूट करत आताना को-प्रोड्यूसरने मध्येच काढून टाकले होते. ईशा बाबत असे म्हंटले जाते की कित्येक जण तिला फक्त यासाठी काम देत नाही कारण तिला या गोष्टींशी जुळवून घेता येत नाही.

ईशा गुप्ताने फक्त चित्रपटातच नाही तर टेलिव्हीजन, वेब सिरीज आणि म्युसिक अल्बममध्ये देखील काम केले आहे. बॉलिवूडमध्ये तिच्या अभिनयासाठी ईशाला अनेक अवोर्ड देखील मिळाले आहेत. ईशा फक्त एक अभिनेत्रीच नाही तर एक खूप चांगली मॉडल देखील आहे. मॉडेलिंगमध्ये देखील ईशाने अनेक मोठमोठ्या स्पर्धा जिंकल्या आहेत. मॉडेलिंग मधूनच ईशाने तिच्या करिअरला सुरुवात केली आणि त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये काम करायला सुरुवात केली.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !