Headlines

सनी लिओनला पण बोल्डनेसच्या बाबतीत टक्कर देते शाहरुख खानची ऑन स्क्रीन मुलगी, पहा फोटोज !

हिंदी चित्रपटसृष्टीतील ब्लॉकबस्टर चित्रपट ‘कुछ कुछ होता है’मध्ये शाहरुख खान आणि काजल यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी आणि सलमान खान देखील विशेष भूमिकेत दिसले होते. शाहरुख आणि काजोलच्या करिअरला कुछ कुछ होता है या चित्रपटाने मोठी गती मिळाली, तर सहाय्यक भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनाही मोठे यश मिळाले. या सर्व कलाकारांमध्ये शाहरुखची मुलगी हे पात्र साकारणारी लहान बालकलाकारही चांगलीच पसंतीस उतरली होती.

चित्रपटांमध्ये लहान मुलांची भूमिका साकारत प्रसिद्धी मिळवलेले अनेक कलाकार आहेत. काही कलाकार हे सध्याच्या घडीला बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत तर काही जण या लाईमलाईटपासून दूर आहेत. तर कुछ कुछ होता है या चित्रपटातील लहान मुलीचं पात्र साकारलेली ती मुलगी इतर कोणी नसून अभिनेत्री सना सईद आहे.

या चित्रपटात शाहरुख आणि राणी मुखर्जीची मुलगी अंजलीची भूमिका साकारणारी सना सईद त्यावेळी केवळ १० वर्षांची होती आणि तिच्या अभिनयाला खूप पसंती मिळाली होती. सना आता बरीच मोठी झाली असली तरी ती तिच्या बोल्डनेससाठी प्रसिद्ध आहे. तिचे अनेक हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतील. आज सना सईद तिचा ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने तिच्या आयुष्याशी संबंधित काही किस्से जाणून घेऊया.


वयाच्या १० व्या वर्षी लोकप्रिय सना सईद – वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटात काम केल्यानंतर प्रकाशझोतात आली होती. यानंतर त्यांनी ‘हर दिल जो प्यार करेगा’, ‘बादल’ सारख्या अनेक चित्रपटात तिने काम केले. बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर सना सईद टीव्हीच्या दुनियेतही यशस्वी ठरली.


२००१ ते २०१२ पर्यंत तिने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले. सनाने ‘सात फेरे’, ‘कवियांजली’, ‘बिदाई’, ‘लो हो गई पूजा इस घर की’, ‘ससुराल गेंदा फूल’, ‘कुमकुम’ यांसारख्या अनेक टीव्ही मालिकांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले. यानंतर सना सईद पुन्हा एकदा बॉलिवूड इंडस्ट्रीकडे वळली आणि पुन्हा एकदा करण जोहरने तिला संधी दिली.


‘स्टुडंट ऑफ द इयर’ चित्रपटात सना एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती आणि तिच्या बोल्ड अवताराचीही खूप चर्चा झाली होती. सनाने या चित्रपटात अनेक बोल्ड सीन्स दिले आहेत. याशिवाय ती तिच्या बिकिनी फोटोंमुळेही खूप चर्चेत होती.

सनाच्या बिकिनी लूकवर वडील संतापले होते – सना सईदच्या घरच्यांना तिचा बोल्ड अवतार अजिबात आवडला नसल्याचं म्हटलं गेलं. तिच्या आई-वडिलांनीही तिच्या बिकिनी लूकवर आक्षेप घेतला होता. रिपोर्टनुसार, अभिनेत्रीच्या वडिलांची इच्छा नव्हती की तिने अभिनयात करिअर करावे आणि मुलीने लहान कपडे घालणे त्यांना आवडत नव्हते.


सनाने जेव्हा ‘स्टुडंट ऑफ द इयर’ चित्रपटात काम केले होते आणि बिकिनीमध्ये शूट केले तेव्हा तिचे वडील संतापले. तर सना मानते की त्यावेळच्या पिढीची विचारसरणी वेगळी होती आणि आजच्या काळात परिस्थिती बदलली आहे.


सना सईद सध्या अभिनय जगतापासून दूर कॅलिफोर्नियामध्ये आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. तिचा चाहता वर्गदेखील जबरदस्त आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !