साउथ इंडिया मधील प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या व्यक्तीच्या चित्रपटासाठी नव्हे तर तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी चर्चेत आहे. साई पल्लवी सर्वाधिक हायलाईट तेव्हा झाली जेव्हा तीने फेअरनेस क्रीमची दोन करोड ची जाहिरात नाकारली. आज आम्ही तुम्हाला साई पल्लवीशी संबंधित काही गोष्टी सांगणार आहोत.
दोन करोडची जाहिरात नाकारली – साई पल्लवी ने जेव्हा फेअरनेस क्रीम ची जाहिरात ती पण साधीसुधी नव्हे तर दोन करोडची जाहिरात नाकारली तेव्हा ते सर्वांच्या चर्चेत आली. एका मुलाखतीदरम्यान साई ने सांगितले होते की अशाप्रकारे जाहिरातींमधून मिळणाऱ्या पैशांचे मी काय करू. मी घरी जाऊन त्याच ३ चपात्या आणि भात खाणार आहे जे नेहमी खाते. त्यामुळे माझ्या जीवनातील आवश्यकता अधिक नाही.
आजकालच्या काळात मुलींना मेकअपचे खूप वेड असते. परंतु या मुलींमध्ये साई पल्लवी खूपच वेगळी आहे कारण तिला मेकअप करणं बिल्कुल आवडत नाही. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान तर ती सर्वात कमीत कमी मेकअप लावते तर काही काही वेळेस मेकअप लावत सुद्धा नाही. एका मुलाखतीमध्ये तिने सांगितले होते की प्रेंमम या चित्रपटाचे दिग्दर्शक अल्फोंस पुथरेन यांनी तिला या गोष्टीसाठी खूप प्रोत्साहन दिले.
आपल्या अदाकारीने लोकांच्या मनावर राज्य करणारी सुंदर आणि हुशार अशी साई पल्लवी पेशाने डॉक्टर आहे. साईने त्बिलिसी स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, जॉर्जिया मधून एमबीबीएसची डिग्री संपादन केली आहे. साई पल्लवी ही साउथ इंडियन चित्रपटांमध्ये काम करण्या आधी तेलगू सीजन डान्स शो चा एक हिस्सा होती. तिने मल्याळम चित्रपट प्रेमम मधून चित्रपट सृष्टीत पदार्पण केले होते.
फिदा या चित्रपटांमधून तेलगू फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते. अगदी काही वर्षांमध्ये संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवणारी साई पल्लवी तिच्या डाऊन टू अर्थ या स्वभावासाठी सर्वाधिक ओळखली जाते. साई पल्लवीचा नुसते साउथ इंडिया मध्येच नव्हे तर संपूर्ण भारतात चाहता वर्ग पसरला आहे.