Headlines

प्रवासादरम्यान उलट्यांचा त्रास होत असेल तर हे घरगुती उपाय करून पहा !

असे म्हणतात की शक्य झाले तर माणूस सर्व गोष्टींना लगाम घालू शकतो. परंतु प्रवासादरम्यान होणाऱ्या उलट्यांमुळे तुमचे फिरणे त्रासदायक होऊ शकते. त्यामुळेच अधिकतर लोक उलट्यांमुळे प्रवास करणे नाकारतात. उलटी होण्याचा त्रास कोणालाही होऊ शकतो. जर तुम्हाला सुद्धा प्रवासादरम्यान असा त्रास होत असेल तर आम्ही आज तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही सुखकर व आरामदायक प्रवास करू शकता.

जीरे – प्रवासासाठी निघण्याआधी जिऱ्याची पावडर करून ती पाण्यामध्ये मिसळावी आणि ते पाणी प्यावे. असे केल्याने प्रवासादरम्यान उलटी आणि मळमळ यांसारखा त्रास होत असेल तर तो बंद होईल.
लवंग – प्रवासादरम्यान तुम्हाला अचानक मांडणे सुरू झाले तर लगेच तोंडामध्ये लवंग घेऊन ती चोखा. असे केल्याने लगेचच तुमचे मळमळणे कमी होईल.
लिंबू- उलटी आणि मळमळ होणे यांसारख्या समस्यांपासून मुक्तता मिळण्यासाठी लिंबू फार गुणकारी असतो‌. जर तुम्हाला प्रवासादरम्यान उलट्यांचा त्रास होत असल्यास प्रवासात तुमच्या सोबत एक लिंबू जरूर ठेवा. अचानक प्रवासात तुम्हाला कसेतरी वाटू लागल्यास त्या लिंबाचे साल सोलून त्याचा वास घ्यावा त्यामुळे उलटी होत नाही आणि तुमचे मन ही स्वस्थ राहते.
कांद्याचा रस – जर तुम्हाला प्रवासात उलट्यांचा त्रास होत असेल तर प्रवास सुरू करण्यापूर्वी अर्धा तास आधी एक चमचा कांद्याच्या रसामध्ये एक चमचा आल्याचा रस मिसळावा. यामुळे प्रवासादरम्यान उलट्या होणे थांबते. प्रवास जर दूरचा असेल तर रस सोबत ठेवू शकता.
गाणे ऐकावे – काही लोकांना प्रवासादरम्यान काही ना काही वाचण्याची किंवा लिहिण्याची सवय असते. परंतु असे मुळीच करू नका अशाने तुम्हाला गरगरू करू शकते. त्याबद्दल तुम्ही गाणी ऐकावीत.
ताजी हवा – प्रवासादरम्यान खिडकीच्या इथे डोके मागे ठेवून आरामात बसावे. अशाने खिडकी द्वारे मोकळी हवा तुम्हाला मिळेल.
पुदिन्याचे तेल – प्रवासात ज्या क्षणी तुम्हाला उलटी किंवा मळीची भावना त्यावेळी रुमालावर किंवा कोणत्याही सुती कापडावर एक ते दोन पुदिन्याच्या तेलाचे थेंब घ्यावेत व त्याचा सुगंध घ्यावा. त्यामुळे उलट्या होणार असतील तर त्या थांबतात.
आवळा सुपारी – प्रवास करताना एसी चालू ठेवण्यासाठी गाडीच्या काचा बंद केल्या जातात. त्यावेळी मळमळण्याचा त्रास होऊ शकतो. अशावेळी आवळा सुपारी तोंडात चघळत राहावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *