Headlines

दात दुखीसाठी हे घरगुती उपाय करून पहा, मिळेल दातदुखी पासून मुक्ती ! 

आजकाल दात आणि हिरड्या संबंधित दुखणे ही सर्व सामान्य गोष्ट झाली आहे. दात किंवा हिरड्यांमध्ये कोणतीही समस्या आढळल्यास माणूस वेदनेने त्रस्त होतो. यामुळे खाणे-पिणे सुद्धा योग्य रीतीने होत नाही त्यामुळे वेगळी समस्या उद्भवू शकते. दातांचे दुखणे कोणालाही त्रासदायक ठरू शकते. दात दुखू लागले की काही लोक घरगुती उपाय करतात तर काही डॉक्टरांचा सल्ला घेतात. आज आम्ही तुम्हाला या पोस्ट द्वारे दात दुखी च्या त्रासापासून मुक्तता मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत.
मिठाचे पाणी – जर तुमच्या हिरड्यांमध्ये दुखत असेल तर मिठाचे पाणी तुम्हाला खूप फायदेशीर ठरू शकते. त्यासाठी तुम्ही फक्त दिवसातून तीन ते चार वेळा कोमट मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्यात. मिठाचे पाणी तोंडात होणाऱ्या इन्फेक्शन पासून वाचवते आणि दातांमध्ये अडकलेले अन्न बाहेर काढण्यास मदत करते. या पाण्यामुळे तोंडात असलेली सूज उतरण्यास मदत होते तसेच तोंडात असलेले बॅक्टेरिया नष्टा होतात त्यामुळे दात दुखी पासून आराम मिळतो.
लवंग – दात दुखी च्या त्रासापासून मुक्तता मिळण्यासाठी लवंग गुणकारी आहे. लवंग मध्ये अँटीइम्प्लिमेंटरी, अँटी बॅक्टेरियल, एंटीऑक्सीडेंट आणि एनेस्थेटिक यांसारखे गुण असतात. यामुळे दातांमधील दुखणे कमी होते तसेच तोंडात असलेल्या किटाणूंचे संक्रमण कमी होण्यास मदत होते. ज्या दाताचे दुखणे असेल तेथे लवंग दाबून धरावी जेणेकरून दुखणे कमी होते.
लसूण – लसुन त्याच्या अनेक औषधी गुणधर्मासाठी ओळखला जातो. एरवी लसणीचा उपयोग सर्दी-पडसे यांसारख्या आजारांसाठी उपाय म्हणून केला जातो. परंतु दात दुखी सारख्या त्रासांमध्ये लसूण तोंडातील बॅक्टेरियांचा नाश करतो आणि पेन किलर म्हणून काम करतो. यासाठी लसुन ठेचुन त्याची पेस्ट करा आणि ती दातांना व हिरड्यांना लावा.
हिंग – दात दुखत असेल तर हिंगाच्या पावडर मध्ये लिंबाचा रस मिसळावा. आणि त्याची पेस्ट करून जो दात दुखत असेल त्या ठिकाणी लावावा. दात दुखीचा त्रास कमी होतो.
काळी मिरी – दात दुखी ची किंवा हिरडी दुखीची समस्या त्रास देत असेल तर काळीमिरी पावडर करून त्यात मीठ मिसळावे आणि त्याने दात घासावे. त्याचप्रमाणे हिरड्यांची मालिश करावी. नंतर गरम पाण्याने गुळण्या कराव्यात यामुळे दात दुखीचा त्रासासाठी नक्कीच फरक जाणवतो. तसेच हिरड्यांमधून रक्त येत असेल तर ते थांबते.
आलं – दात दुखी वर आलं देखील परिणामकारक ठरते. दात किंवा हिरडी दुखत असल्यास आल्याचा तुकडा ठेचून त्यात थोडे सैंधव मीठ घालावे. आणि या मिश्रणाची गोळी बनवून ती दुखर्‍या दाताखाली ठेवावी. त्यामुळे दातांमध्ये ठणके मारत असल्यास ते कमी होतात. शिवाय रोज सकाळी आल्याचा तुकडा चावून खाल्ल्यामुळे दात बळकट होण्यास मदत होते.
डॉक्टरांचा सल्ला घ्या – दातांच्या हलक्या दुखण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करून ते ठीक करू शकता परंतु दुखणे खूप असेल तर डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *