Headlines

मर्सिडीज पेक्षाही अधिक किमतीचे आहे शाहरुखचे घड्याळ !

काही दिवसांपूर्वीच जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले अमेझोन चे सीइओ जेफ बेजोस भारत यात्रेसाठी आले होते. त्यावेळी जेफ बेजास ने भारतामध्ये एक मिलियन डॉलर ची गुंतवणूक करण्याची घोषणा देखील केली. परंतु त्यावेळी सर्वांची नजर तेथे उपस्थित असलेल्या शाहरुख खानच्या मनगटावर असलेल्या घडाळ्यावर होती. हे घडयाळ काही साधेसुधे नव्हते. या घडाळ्याच्या किमतीमध्ये एक महागडी लग्झरी कार येईल आणि त्यातून ही काही पैसे उरतील. शाहरुखच्या त्या घड्याळाचे नाव एक्वानॉट क्रोनोग्राफ वॉच असे आहे. हे घडयाळ प्रसिद्ध घडयाळ निर्माती कंपनी पैटेक फिलिप ने बनवले आहे. या घड्याळाची किंमत अमेरिकी चलना प्रमाणे ४५,००० डॉलर्स एवढी आहे तर भारतीय चलनाप्रमाणे तीस लाख हून अधिक आहे.
या घड्याळाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हे घडयाळ कोणासाठीही बनवले जात नाही जर कोणाला असे घडयाळ हवे असल्यास तर त्या व्यक्तीस पहिले कंपनीकडे त्या घड्याळाची मागणी करावी लागते. त्यानंतर कंपनीकडे पैसे जमा करावे लागतील. आणि त्यानंतरच त्या व्यक्तीसाठी घडयाळ बनवले जाते. पैटेक फिलिप ही घडयाळ बनवणारी कंपनी स्विटज़रलैंड मध्ये आहे. स्विटज़रलैंड मधील ही कंपनी सुंदर, आकर्षक आणि महागडी घड्याळे बनवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. जगातील आतापर्यंतचे सर्वात महागडे घडयाळ विकण्याचा रेकॉर्ड सुद्धा या कंपनीच्या नावावर नोंदवला आहे. गेल्या वर्षीच नोव्हेंबर महिन्यातच एका लिलावा दरम्यान पैटेक फिलिप कंपनीचे घडयाळ २.२० अब्ज रुपयांना विकले गेले. पैटेक फिलिप ग्रैंडमास्टर चाइम Ref 6300A-010 असे या घड्याळाच्या मॉडेलचे नाव होते. या आधी सर्वात महागडे घडयाळ विकण्याचा रेकॉर्ड रॉलेक्स या कंपनीच्या नावावर होता.
पैटेक फिलिप ही कंपनी १८३९ सालापासून घडयाळ बनवण्याचे काम करत आहे. अजूनसुद्धा ही कंपनी १९ व्या शतकातील पारंपारिक पद्धतीचे घड्याळ सुद्धा बनवते. या कंपनीचे असे म्हणणे आहे की या कंपनीची घड्याळे फक्त राजघराण्यातील लोक किंवा खूप श्रीमंत व्यक्तीच खरेदी करतात. दरवर्षी ही कंपनी फक्त ५०,००० घड्याळे बनवते. कंपनीचे असे देखील म्हणणे आहे की त्यांच्या घड्याळांची पुनर्विक्री किंमत कधीच घटत नाही याउलट ती अजून जास्त वाढते. या कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या घड्याळाची डिझाईन ही एकदम वेगळी असते आणि त्याची क्वालिटी खूप चांगली असते. या घड्याळाच्या मशीन्स शिवाय इतर पार्टस हाताने बनवलेले असतात.
या कंपनीला एका घड्याळासाठी नवी डिझाईन तयार करण्यासाठी त्यानंतर तसे घड्याळ बनवण्यासाठी आणि बाजारात लॉंच करण्यासाठी कमीत कमी ३ ते ५ वर्षे लागतात. घड्याळाचे सर्व भाग हे मशीन द्वारा न बनवता ते हाताने बनवले जातात. कंपनीच्या प्रत्येक घड्याळाचे २५२ वेगवेगळे भाग असतात. कंपनीला घड्याळाचे डायल तयार करण्यास चार ते सहा महिने लागतात. हे डायल तयार करण्याच्या कंपनीकडे २०० विविध पद्धती आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *