अभिनेते ‘अमिताभ बच्चन’ यांनी खरेदी केली नवीन विंटेज कार !

983

बॉलिवुडचे बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन पुन्हा एकदा त्यांच्या नवीन कार मुळे चर्चेत आले आहेत. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहेच की बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन वेगवेगळ्या प्रकारच्या कार साठी किती शौकीन आहेत ते. हल्लीच अमिताभ यांनी सोशल मीडियावर पिवळ्या रंगाच्या विंटेज कार सोबत स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. त्यामुळे अमिताभ यांचे चाहते त्यांना या फोटोवर नवीन गाडी घेतल्याबद्दल अभिनंदन अशा कॉमेंट करत आहेत.
अमिताभ यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंट वरून त्यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या कार सोबत एक फोटो शेअर केला आहे आणि त्यावर ‘समय से परे’ असे कॅप्शन दिले आहे. महानायक अमिताभ बच्चन यांचे हे ३४६४ वे ट्विट असून त्यावर त्यांनी लिहिले आहे की, एक वेळ अशी येते जेव्हा आपण निशब्द असतो. आता माझ्यासोबत ही असेच काहीसे होते आहे, मला व्यक्त व्हायचे आहे मात्र शब्द सुचत नाहीत.
अमिताभ बच्चन यांच्याकडे रोल्स रॉयस, रेंज रोवर मर्सिडीज आणि बेंटली यांसारख्या अनेक महागड्या गाड्या आहेत. अमिताभ बियांची आत्ताची नवीन पिवळा रंगाचे कार फोर्ड प्रीफेक्ट आहे. या गाडीचे उत्पादन १९३८ ते १९६१ च्या दरम्यान झाले होते. अमिताभ यांच्याकडे असलेले खास मॉडेल १९५० च्या दशकामध्ये तयार केले होते. अमिताभ यांच्या चाहत्यांनी काही पोस्ट केलेल्या फोटोमध्ये असेही दिसून आले की त्यांच्या घराबाहेर ते स्वतः ड्राईव्ह करत होते. या फोटोमध्ये अमिताभ ड्रायव्हर सीटवर होते तर त्यांच्या बाजूला एक माणूस बसलेला आणि मागील सीटवर एक बाई होती. अमिताभ यांच्या चाहत्यांना तर त्यांची नवीन गाडी फारच आवडलेली दिसते. यावर त्यांनी अनेक वेगवेगळ्या कमेंट सुद्धा केलेल्या आहेत. एकाने कमेंटमध्ये दिले आहे की नवीन गाडी घेतल्याबद्दल खूप अभिनंदन.
तर दुसऱ्याने लिहिले आहे की तुम्हाला नवीन कार सोबत बघून खूप छान वाटले. नेहमी आनंदी राहा. एकाने तर लिहिले आहे की अमिताभ यांच्याकडे १९९१ मध्ये आलेल्या अकीला या चित्रपटात पिवळ्या रंगाची एक गाडी होती जिला रामप्यारी असे ओळखले जायचे.
बॉलीवूड च्या महानायकाचे यावर्षी अनेक चित्रपट प्रदर्शित होतील, यामध्ये गुलाब सिताबो ( १७ एप्रिल ), झुंड ( ८ मे ) चेहरे ( १७ जुलै ) आणि ब्रह्मास्त्र ( ४ डिसेंबर) चित्रपटांचा सहभाग आहे. गेल्यावर्षीच अमिताभ बच्चन यांनी बॉलिवुडची ५० वर्षे पूर्ण केले. ७ नोव्हेंबर १९६९ ला अमिताभ यांचा पहिला सात हिंदुस्तानी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.