Headlines

३३ वर्षांनी रामाची भूमिका करणाऱ्या अरुण गोविल यांनी बोलून दाखवली त्यांच्या मनातील खंत !

रामानंद सागर यांची रामायण ही मालिका त्यात ३० वर्षांनी पुन्हा दूरदर्शन वर प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. त्या तीस वर्षांपूर्वी सुद्धा या मालिकेने यशाची सर्व शिखरे पार केली होती आणि आता इतक्या वर्षांनी सुद्धा ही मालिका प्रेक्षकांचे मन जिंकून घेण्यास पूर्णतः यशस्वी झाली आहे.
या मालिकेची जादू प्रेक्षकांवर एवढी झाली होती की या मालिकेतील राम आणि सीता म्हणजेच अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया या दोघांना प्रेक्षक खरे खुरे देव मानू लागले होते.‌ मात्र छोट्या पडद्यावर भगवान श्रीरामाची भूमिका जिवंत करणाऱ्या अरुण गोविल यांना त्यांच्या योगदानाचा कोणत्याही प्रकारचा सन्मान मिळाला नाही. याबाबतची खंत त्यांनी नुकतीच व्यक्त केली.
फिल्मफेअर मॅगझीन पत्रकाराद्वारे विचारल्या गेलेल्या प्रश्नांना उत्तर देते वेळी अरुण गोविल यांनी ट्विटरवर मनमोकळेपणाने आपली बाजू मांडली. एका प्रश्न त्यांना विचारले गेले की अभिनय क्षेत्रातील तुमचे योगदान हे खूप मोठे आहे खासकरून रामायण या मालिकेतील पण तुम्हाला रामायण या मालिकेसाठी कोणत्याही पुरस्काराने सन्मानित केले नाही का ?
या प्रश्नावर स्वतःचे दुःख मांडताना अरुण यांनी लिहिले की, मला रामायण या मालिकेसाठी कोणत्याही प्रकारचा सन्मान दिला गेला नाही मग ते राज्य सरकार द्वारे असो केंद्र सरकार द्वारे! मी स्वतः उत्तर प्रदेशातील आहे परंतु तेथील सरकारने देखील माझा कधीच सन्मान केला नाही. शिवाय मी गेली पन्नास वर्षे मुंबईत वास्तव्यास आहे परंतु महाराष्ट्र सरकारने पण माझा कधीच सन्मान केला नाही.
दुसरा प्रश्न अरूण यांना विचारला गेला की आता इतक्या वर्षांनी रामायण दुसऱ्यांदा प्रक्षेपित होऊ लागले आहे तर वेळ बदला त्याबरोबर काही प्रेक्षकही बदलले असतील त्यामुळे वर्तमान काळातील प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आणि ३३ वर्षांपूर्वीच्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया यांमध्ये तफावत जाणवते का ?
यावर उत्तर देताना अरुण यांनी लिहिले, काळ आणि दर्शक भलेही बदलला असेल पण या मालिके प्रतीच्या प्रेक्षकांच्या मनातील भावना या अजूनही बदललेल्या नाही. आज जितके लोक मला देव म्हणून संबोधतात तितक्या लोकांनी ३३ वर्षांपूर्वी देखील संबोधले नव्हते. आज या मालिकेचा प्रेक्षकवर्ग खूप वाढला आहे.
अरुण गोविल यांना पुढचा प्रश्न विचारला गेला की ३३ वर्षांपूर्वी जेव्हा ही मालिका प्रसारित झाली तेव्हा अक्षरश: लोकांनी या मालिकेला डोक्यावर घेतले. प्रेक्षक तुम्हाला खरे देव मानू लागले. तुमच्यामध्ये देवाची प्रतिमा शोधू लागले. एका कलाकारांसाठी याहून मोठी कौतुकाची पावती असूच शकत नाही. पण तुमच्या अशा इमेज मुळे तुम्ही कधी अडचणीत सापडला आहात का? यावरून म्हणाले, रामायण या मालिकेनंतर मला कमर्शियल चित्रपट मिळणे बंद झाले.
प्रत्येक गोष्टीच्या सकारात्मक आणि नकारात्मक अशी दोन्ही बाजू असतात. रामायण या मालिकेमुळे मला जितके मिळाले ते कदाचित मला भरपूर चित्रपट करून सुद्धा मिळाले नसते. या मालिकेमुळे भगवान रामाचे नाव माझ्याशी जोडले गेले. अजुन काय हवे मला ! मी एक माणूस आहे आणि एवढे माझ्यासाठी भरपूर आहे. अरुण यांना जेव्हा विचारले की ते ट्विटर पासून इतके काळ दूर का होते तर त्यांनी सांगितले की माझ्या मुलीने २०११ मध्ये माझे ट्विटर वर अकाउंट उघडून दिले.
पण त्यावेळी मी एवढा ऍक्टिव नव्हतो. रामायण या मालिकेच्या पुन्हा प्रक्षेपणानंतर मित्रांच्या आणि प्रेक्षकांच्या आग्रहास्तव या माध्यमाशी जोडला गेलो. त्यासाठी सर्वात आधी मी माझ्या नावाने बनलेली खोटी अकाउंट बंद करायला लावली. आता मी या माध्यमातून सतत ॲक्टिव्ह राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *