ऐश्वर्याच्या डुबलीकेटने सोशल मीडियावर उडवून दिली धमाल, जाणून घ्या कोण आहे ती मुलगी !

2654

सध्या कोरोनाव्हायरस मुळे लॉक डाउन वाढतच चालला आहे. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या परीने गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये कलाकार मंडळी सोशल मीडियावर खूप वेळ ऍक्टिव्ह राहून स्वतःचे फोटो व्हिडिओ शेअर करून त्यांच्या फॅन्स सोबत कनेक्ट करण्याचा अतोनात प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान बॉलिवूडची सदाबहार सौंदर्यवती ऐश्वर्या राय-बच्चन सारखीच दिसणारी एक मुलगी सोशल मीडियावर धमाल उडवत आहे.
बच्चन कुटुंबाची सून आणि एके काळची विश्वसुंदरी ऐश्वर्या राय-बच्चनने स्वतःच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे बॉलीवूड मध्ये एक वेगळीच उंची वाढली आहे तर दुसरीकडे ऐश्वर्या सारखी दिसणारी एक मुलगी सध्या टिक टॉक वर खूप व्हायरल होत आहे.
ऐश्वर्या राय सारख्याच दिसणाऱ्या मुलीचे नाव अशिता सिंह राठोर आहे. या मुलीला लोक सध्या खूप पसंत करत असून तिचे टिक टॉक चे व्हिडिओ सुद्धा या लॉक डाऊन मध्ये खूप व्हायरल झालेले आहेत. तुम्ही हे वाचून हैराण व्हाल पण अशी त्याला टिक टॉक वर येऊन फक्त सातच दिवस झाले असून एवढ्या कमी दिवसात तिचे १६०० हून अधिक फॉलोवर्स झाले आहेत. नुकताच अशिताचा एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये ती ऐश्वर्या रायचा चित्रपट जोश मधील अपून बोला तू मेरी लैला या चित्रपटामधील गाण्यावर लीपसिंक करत होती.
‌ तसेच आशिताचा अजून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती ये दिल हे मुश्किल या चित्रपटातील शायरी बोलताना दिसत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत पाच हजारहून अधिक वेळा पाहिले गेले आहे. आशिता चे ऐश्वर्या राय प्रमाणेच डोळे निळे असून केस आणि एक्सप्रेशन सुद्धा सारखेच आहेत. त्यामुळे सध्या ऐश्वर्या रायचे चाहते आशिताला तिची डुबलीकेट म्हणून तिच्यावर सुद्धा खूप प्रेम करत आहेत.
ऐश्वर्या राय बद्दल बोलायचे झाल्यास मुलीला जन्म दिल्यानंतर ती चित्रपट सृष्टीत थोडी कमी ॲक्टिव राहू लागली. तिला शेवटी फन्ने खान या चित्रपटात पाहिले गेले होते. या चित्रपटात तिच्यासोबत अनिल कपूर आणि राजकुमार राव प्रमुख भूमिकेत दिसले होते. लवकरच ऐश्वर्या गुलाब जामुन या चित्रपटात दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात तिच्यासोबत तिचा नवरा अभिषेक बच्चन हा प्रमुख भूमिकेत असेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !